Pune: रुग्णालयातून बाहेर पडले अन् मृत्यूने गाठले! कारच्या धडकेत दीर-भावजय ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 21:26 IST2025-01-02T21:24:52+5:302025-01-02T21:26:34+5:30

पुण्यातील येरवडा ते विमानतळ रस्त्यावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला. 

Pune: Left the hospital and met death! Brother-in-law and brother-in-law killed in car-bike collision | Pune: रुग्णालयातून बाहेर पडले अन् मृत्यूने गाठले! कारच्या धडकेत दीर-भावजय ठार

Pune: रुग्णालयातून बाहेर पडले अन् मृत्यूने गाठले! कारच्या धडकेत दीर-भावजय ठार

Pune Accident: एअरफोर्सच्या ईसीएच हॉस्पिटलमधून उपचार घेऊन घरी जात असताना वळण घेताना दुचाकी आणि चार चाकी गाडीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकी वरील दोन जणांचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवार (२ जानेवारी) सकाळी नऊच्या सुमारास येरवडा ते विमानतळ रस्त्यावर झाला.

अपघातामध्ये आशीर्वाद नागेश गोवेकर (वय 52 रा. मापसा,  गोवा)  यांचा जागीच, तर त्यांच्या भावजय रेश्मा रमेश गोवेकर (वय 66 रा. भैरव नगर, पुणे) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. 

अपघाताची नोंद विमानतळ पोलीस ठाण्यात झाली असून कारचालक अचल कुमार नरेंद्र कुमार प्रसाद यास पोलिसांनी अपघात प्रकरणी नोटीस बजावली आहे.

कसा घडला अपघात? पुणे पोलिसांनी दिली माहिती

विमानतळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साईबा पोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील मयत आशीर्वाद गोवेकर व रेश्मा गोवेकर यांचे दीर, भावजय असे नाते आहे. 

रेश्मा यांची तब्येत बिघडल्याने एअर फोर्सच्या ईसीएच रुग्णालयात आशीर्वाद गोवेकर सकाळी दुचाकीवरुन घेऊन आले होते. उपचार घेतल्यानंतर दोघेही दुचाकी वरुन घरी निघाले होते. 

रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर येरवडा ते विमानतळ या मुख्य रस्त्यावरून उजवीकडे (फाईव्ह नाइन) चौकाकडे वळत होते. दुचाकी वळण घेतं असताना येरवड्याच्या दिशेने जाणारी बस व इतर वाहने थांबली होती.  

याच दरम्यान फाईव्ह नाइनच्या  दिशेने भरधाव वेगात महिंद्रा एसयूव्ही कार थांबलेल्या बस व इतर वाहनांना ओव्हर टेक करत असताना दुचाकी आणि चारचाकी यांच्यात समोरा-समोर अपघात झाला. 

हा अपघात इतका भीषण होता की, आशीर्वाद गोवेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर रेश्मा गोवेकर यांना गंभीर जखमी अवस्थेत जवळील ईसीएच रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. 

रेश्मा यांचा उपचार सुरू असताना मृत्यु झाला. अपघातामध्ये दुचाकी, चार चाकी गाडीचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरा मयत रेश्मा यांच्या मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: Pune: Left the hospital and met death! Brother-in-law and brother-in-law killed in car-bike collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.