शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

यंदाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) १० ते १७ जानेवारी दरम्यान रंगणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 12:02 PM

नवीन वर्षाची चाहूल लागल्यानंतर रसिकांना वेध लागतात ते पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ....

ठळक मुद्देमहात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त वाहिली जाणार  ‘चलचित्र’ आदरांजली‘इन सर्च आॅफ ट्रुथ-सेलिब्रिटिंग १५० इयर बर्थ अँनिव्हर्सरी आॅफ महात्मा गांधी’ संकल्पना निवडक १५० हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार

पुणे : इफ्फीप्रमाणेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही (पिफ) महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीची दखल घेण्यात आली असून, ‘इन सर्च आॅफ ट्रुथ-सेलिब्रिटिंग १५० इयर बर्थ अँनिव्हर्सरी आॅफ महात्मा गांधी’ या संकल्पेनवर यंदाचा महोत्सव  रंगणार आहे. पुणे फिल्म फौंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दि. १० ते १७ जानेवारी दरम्यान पिफचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन वर्षाची चाहूल लागल्यानंतर रसिकांना वेध लागतात ते पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे.. महोत्सवामध्ये देशविदेशातील विविध चित्रपटांचा आस्वाद घेण्याची पर्वणी मिळत असल्याने रसिकांना महोत्सवाची उत्सुकता लागलेली असते. जागतिक स्तरावरही पिफने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्याने विदेशातही महोत्सवाची चर्चा सुरू होते. यंदाच्या वर्षीही  विविध देशांकडून  महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, 114 देशांमधून १६३४  चित्रपट प्राप्त झाले आहेत.  त्यातील निवडक १५० हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. महात्मा गांधी यांचे योगदान केवळ स्वातंत्र्यलढ्यापुरतेच मर्यादित नाही. त्यांच्या विचारांचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे. यावर्षी महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आणि तत्वज्ञानावर आधारित काही जागतिक दर्जाचे चित्रपट महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. याशिवाय महोत्सवात जागतिक आणि मराठी स्पर्धात्मक विभाग, माहितीपट,कं ट्री फोकस, आशियाई ,जागतिक चित्रपट, सिंहावलोकन ( रेस्ट्रोपेक्टिव्ह), भारतीय चित्रपट, आजचा मराठी चित्रपट, विशेष स्क्रिनिंग आणि कँलिडोस्कोप आदी विविध विभागामध्ये दर्जेदार, आशयसंपन्न कलाकृती पाहाण्याची संधी रसिकांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.  या महोत्सवातील चित्रपट पाहाण्यासाठी नोंदणी प्रक्रियेची माहिती www.piffindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून,  11 डिसेंबर पासून या संकेतस्थळावर आॅनलाईन नोंदणीला सुरूवात होणार आहे.  --------------------------------------------------------------------------------------------------------पिफ च्या  ‘ट्रिब्युट’ विभागामध्ये संगीत, साहित्य क्षेत्रातील दिग्गजांची साजरी होणार जन्मशताब्दी गदिमा, बाबुजी, पु.ल देशपांडे, उस्ताद अल्लारखॉं आणि स्नेहल भाटकर या साहित्य आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या  जन्मशताव्दीवर्षास प्रारंभ झाला आहे.  पिफमध्ये चित्रपटसृष्टीसाठी योगदान दिलेल्या दिग्गजांची दखल घेतली जाणार असून,  ‘ट्रिब्युट’ विभागात त्यांनी अजरामर केलेल्या चित्रकलाकृती सादर केल्या जाणार असल्याचे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.--------------------------------------------------------------------

टॅग्स :PIFFपीफMahatma Gandhiमहात्मा गांधीcinemaसिनेमा