शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर जीवे मारू; नवऱ्याची धमकी, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 12:25 IST

लग्नाला अवघे १ वर्ष होत असताना सासरकडून कंपनी चालविण्यासाठी २० लाख रुपये आणण्याच्या कारणावरून विवाहितेला त्रास दिला जात होता

पुणे : पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक येथे धक्कादायक घटना घडली आहे. रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर जीवे मारू अशी नवऱ्याने रक्षाबंधनाच्या दिवशी धमकी देताच अवघ्या काही तासात 27 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.  याप्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या ने मानसिक शारीरिक छळ करून वारंवार पैशाची मागणी केल्याचा आरोप देखील विवाहित तरुणीच्या नातेवाईकांचा केला आहे. स्नेहा विशाल झेंडगे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत (वय ५५, रा. कर्देहळी, जि. सोलापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

लग्नाला अवघा एक वर्ष होत असताना सासरकडून कंपनी चालविण्यासाठी २० लाख रुपये आणण्याच्या कारणावरून सातत्याने होणारा मानसिक आणि शारीरिक छळ सहन न झाल्याने विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती, सासरे, सासू, दीर, ननंद यांच्यासह सात जणांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, ननंद तेजश्री थिटे आणि इतर दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि विशाल यांचा विवाह २ मे २०२४ रोजी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच सासरकडील मंडळींनी कंपनी चालविण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यास सुरुवात केली. या पैशासाठी स्नेहाला वारंवार शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता. स्नेहाने यापूर्वीही या छळाविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र आरोपी संजय झेंडगे यांचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ याने तिला दमदाटी करून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले होते. तक्रार मागे घेतल्यानंतरही छळ सुरूच राहिला.

शेवटी हा छळ असह्य झाल्याने ९ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता स्नेहाने आंबेगाव बुद्रुक येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८५, ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेambegaonआंबेगावWomenमहिलाmarriageलग्नDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी