पुणे - पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या समारोपाने आज पुणेकरांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला. खेळासोबतच मराठी संस्कृतीचा रंगतदार ठसा उमटवत, स्पर्धेच्या अंतिम दिवशी सहभागी झालेले विदेशी सायकलपटू लोकप्रिय मराठी गाणं ‘नटीनं मारली मिठी’ च्या तालावर मनमुराद थिरकताना पाहायला मिळाले.
स्पर्धेनंतरच्या आनंदोत्सवात अचानक वाजलेल्या या मराठमोळ्या गाण्याने परदेशी खेळाडूंना अक्षरशः वेड लावलं. पारंपरिक ठेक्यांवर त्यांनी केलेला उत्स्फूर्त डान्स उपस्थित प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरला. या आनंदी क्षणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.व्हिडिओमध्ये विविध देशांतील सायकलपटू मराठी गाण्याच्या तालावर एकत्र नाचताना दिसत असून “मराठी संस्कृतीची जादू”, “पुणेकरांची खासियत” अशा प्रतिक्रिया युजर्सकडून व्यक्त केल्या जात आहेत. काही तासांतच या व्हिडिओवर हजारो लाईक्स आणि शेअर्स झाले आहेत.पुणे ग्रँड टूर स्पर्धेमुळे पुण्याची ओळख केवळ क्रीडानगरी म्हणून नव्हे, तर संस्कृती जपणारे शहर म्हणूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे. खेळ आणि संस्कृतीचा हा अनोखा संगम पुणेकरांसाठी अभिमानास्पद ठरत आहे.
Web Summary : Foreign cyclists at the Pune Grand Tour danced to 'Natin Marli Mithi,' embracing Marathi culture. The video went viral, showcasing Pune's blend of sports and culture.
Web Summary : पुणे ग्रैंड टूर में विदेशी साइकिल चालकों ने 'नटिन मारली मिठी' पर नृत्य किया, मराठी संस्कृति को अपनाया। वीडियो वायरल हुआ, जो पुणे के खेल और संस्कृति के मिश्रण को दर्शाता है।