पुण्यात राज्यपालांनी भर स्टेजवर 'चक्क' महिलेचा मास्कच खाली ओढला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 06:14 PM2021-09-17T18:14:00+5:302021-09-17T18:15:08+5:30

मोदी देशाची शान असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पुण्यात सायकल रॅलीच्या कार्यक्रमाप्रसंगी काढले

In Pune, the governor pulled down the mask of a 'chucky' woman on the stage | पुण्यात राज्यपालांनी भर स्टेजवर 'चक्क' महिलेचा मास्कच खाली ओढला

पुण्यात राज्यपालांनी भर स्टेजवर 'चक्क' महिलेचा मास्कच खाली ओढला

Next
ठळक मुद्देकेंद्र आणि राज्य सरकार नियम पालन करा सांगताना राज्यपालांचे असं कृत्य

पुणे : केंद्र आणि राज्य सरकारने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भर कार्यक्रमात एक वेगळेच कृत्य केल्याचे समोर आले आहे. भर स्टेजवर कार्यक्रमात राज्यपालांनी चक्क एका महिलेचा मास्कचा खाली ओढला आहे. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. मात्र त्या कार्यक्रमाप्रसंगी एका महिला सायकल पटूचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी फोटो काढत राज्यपालांनी केलेला हा प्रकार कॅमेरात टिपला गेला आहे. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.तर दुसर्‍या बाजूला. थेट राज्यपालांनी एका महिलेचा मास्क खाली घेतल्याने,यामुळे एकच चर्चा रंगली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य व्यक्तीपासून असाधारण व्यक्ती बनले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप मेहनत घेऊन या पदापर्यंत पोहोचले आहे. ते आपल्या देशाची शान असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पुण्यात सायकल रॅलीच्या कार्यक्रमाप्रसंगी काढले.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, सायकल रॅली ही एका दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबत नवीन पिढीला प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळण्यास मदत होते. सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देश विदेशातील नागरिकांनी प्रतिसाद देत योग दिवस साजरा केला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

Web Title: In Pune, the governor pulled down the mask of a 'chucky' woman on the stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.