पुणे: गॅस टंचाईमुळे ऑनलाइन इलेक्ट्रिक शेगडी खरेदी करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी तीन लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत ८१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागात राहायला आहेत. त्यांनी, सोशल मीडियावर इलेक्ट्रिक बर्नरची जाहिरात पाहिली होती. गॅस टंचाईमुळे त्यांनी शेगडी खरेदी करण्याचे निश्चित केले. त्यानंतर त्यांनी जाहिरातीतील मोबाईल नंबरवर संपर्क साधला. सायबर चोरट्यांनी शेगडी खरेदीचे पैसे ऑनलाईन पद्धतीने जमा करावे लागतील, असे त्यांना सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा दुरुपयोग करुन चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून तीन लाख दहा हजार रुपये दुसऱ्या एका खात्यात हस्तांतरित केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने करत आहेत.
Web Summary : A Pune senior citizen, seeking an electric stove due to gas shortages, lost ₹3 lakh in an online fraud. Cybercriminals posing as sellers tricked him into sharing bank details and siphoned off the money. Kothrud police are investigating.
Web Summary : पुणे में गैस की कमी के कारण इलेक्ट्रिक स्टोव खरीदने की कोशिश में एक वरिष्ठ नागरिक को ऑनलाइन धोखाधड़ी में ₹3 लाख का नुकसान हुआ। साइबर अपराधियों ने विक्रेता बनकर बैंक विवरण साझा करने के लिए बरगलाया और पैसे निकाल लिए। कोथरुड पुलिस जांच कर रही है।