'ही' मूर्ती आहे, चक्क चंदनाच्या लाकडाची;‘कडबेआळी तालीम’ची गणेशमूर्ती ठरली चर्चा रंगवणारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:38 IST2025-09-01T13:33:29+5:302025-09-01T13:38:51+5:30

भाविक धातूचा गणपती, मातीचा गणपती, लाकडाचा गणपती, पीओपीचा गणपती, फायबरचा गणपती, कागदाच्या लगद्यापासून बनवलेला गणपती यातील विविधता टिपत आहेत.

Pune Ganpati Festival Peshwa era Ganesh idol made of sandalwood | 'ही' मूर्ती आहे, चक्क चंदनाच्या लाकडाची;‘कडबेआळी तालीम’ची गणेशमूर्ती ठरली चर्चा रंगवणारी

'ही' मूर्ती आहे, चक्क चंदनाच्या लाकडाची;‘कडबेआळी तालीम’ची गणेशमूर्ती ठरली चर्चा रंगवणारी

पुणे : गणेशाेत्सव आणि पुणे एक अतूट नाते असून, त्याची भुरळ जगभरातील भाविकांना पडलेली आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी पुण्याच्या मध्यवर्ती भागात प्रचंड गर्दी हाेत आहे. यात भाविकांना लाडक्या गणरायाचे विविध रूपे पाहत आहेत. त्याचबराेबर भाविक धातूचा गणपती, मातीचा गणपती, लाकडाचा गणपती, पीओपीचा गणपती, फायबरचा गणपती, कागदाच्या लगद्यापासून बनवलेला गणपती यातील विविधता टिपत आहेत.

शनिवार वाडा परिसरातील १९३४ साली स्थापन झालेल्या कडबेआळी तालीम मंडळाची गणेशमूर्ती विशेष लक्ष वेधून घेत आहे. त्याचे कारण, ही मूर्ती चंदनाच्या लाकडापासून साकारली असून, तिचा तेज आजही कायम आहे. ‘पीओपी’च्या जगात लाकडी मूर्ती दुर्मिळ झाल्याने सर्वांचे लक्ष या मूर्तीकडे वेधले जात आहे.

पेशवेकालीन चंदनाच्या लाकडाची गणेश मूर्ती, समाेरच छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि पुरंदर किल्ला असे येथील दृश्य. तत्पूर्वीच भव्य प्रवेशद्वार आहे आणि आत येताच स्वामी समर्थ डाेळ्यासमाेर पडतात. स्वामींचे दर्शन घेऊन पायऱ्या चढून आले की गणराय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन भाविक किल्ले पुरंदरचा देखावा पाहत इतिहासात रमून जातात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अमित गोविंदराव पळसकर यांनी दिली.

ट्रस्टी गणेश किसनराव पळसकर आणि मंडळाचे कार्यकर्ते भाविकांची काळजी घेत हाेते. पळसकर यांची ही सहावी पिढी मंडळाचे काम पाहत असून, विविध धार्मिक, सामाजिक कामातही त्यांचा सहभाग असताे, असे ट्रस्टींनी सांगितले. 

Web Title: Pune Ganpati Festival Peshwa era Ganesh idol made of sandalwood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.