शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
2
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
3
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
4
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
5
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
6
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
7
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
8
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
9
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
10
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
11
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
12
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
13
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
14
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
15
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
16
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
18
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
19
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?

Pune Ganpati Festival : गणेशोत्सवात ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 17:54 IST

ध्वनिप्रदूषणाविरोधात जनजागृतीसाठी मंडळांच्या आवारात माहिती फलक लावले गेले असून, ३०० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन तपासणी पथकांमध्ये सामील

पुणे : गणेशोत्सवात काही वर्षांपासून ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) या समस्येला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या आदेशानुसार पुणे शहर व उपनगरांतील सुमारे २०० निवडक गणेश मंडळांमध्ये पहिल्या दिवसापासून ध्वनी पातळीची मोजणी सुरू केली असून, शेवटच्या अकराव्या दिवसापर्यंत सुरू राहणार आहे.

ध्वनिप्रदूषणाविरोधात जनजागृतीसाठी मंडळांच्या आवारात माहिती फलक लावले गेले असून, ३०० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन तपासणी पथकांमध्ये सामील केले आहे. हे पथक दररोज सायंकाळनंतर आवाजाची पातळी मोजून अहवाल तयार करेल. गणेशोत्सवात जनजागृती, आवाजाची मोजणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई अशा तीन स्तरावर ‘एमपीसीबी’ काम करत आहे. नागरिकांनी आणि मंडळांनी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.

ध्वनी मर्यादेचे नियम व कायदेशीर तरतुदी

डेसिबल मर्यादा :

दिवसा : (सकाळी ६:०० ते रात्री १०:००)

निवासी भाग : ५५ डेसिबलव्यावसायिक भाग : ६५ डेसिबल

औद्योगिक भाग : ७५ डेसिबलशांतता क्षेत्र (रुग्णालये, शाळा, न्यायालये) : ५० डेसिबल रात्री (रात्री १०:०० ते पहाटे ६:००) :निवासी भाग : ४५ डेसिबल

व्यावसायिक भाग : ५५ डेसिबलऔद्योगिक भाग : ७० डेसिबलशांतता क्षेत्र : ४० डेसिबल

कायदेशीर तरतूद व शिक्षा : भारतीय दंड संहिता कलम २६८, २९० अंतर्गत सार्वजनिक त्रास दिल्यास गुन्हा दाखल होतो. पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ व ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० अंतर्गत कारवाई केली जाते. नियमभंग करणाऱ्यांवर दंड आकारणी, उपकरण जप्ती व गुन्हा नोंदणी होऊ शकते. दंडाची रक्कम १०,००० रुपये ते १ लाख रुपये इतकी असू शकते, तसेच शिक्षा म्हणून ५ वर्षांपर्यंत कैद होऊ शकते.

टॅग्स :PuneपुणेPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सवpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र