Pune Fire: येवलेवाडीत गोडाऊनमधे भीषण आग; अग्निशमन दलाच्या १२ वाहने घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 16:45 IST2023-07-14T16:38:23+5:302023-07-14T16:45:23+5:30
अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश...

Pune Fire: येवलेवाडीत गोडाऊनमधे भीषण आग; अग्निशमन दलाच्या १२ वाहने घटनास्थळी
येवलेवाडी (पुणे): येवलेवाडी गाव येथील येवलेवाडी कमानीजवळ दीपचंद धर्मचंद शहा या फॅब्रिक कंपनीच्या गोडाऊनला पहाटे आग लागली होती. यामध्ये फॅब्रिक मटेरियलने पेट घेतला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ उठले होते. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले आहे.
घटनास्थळी गोडाऊन व आजूबाजूचा रहिवासी परिसर यामध्ये सुरक्षित अंतर असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच शेजारील इमारतीमधील नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून या भागात आगीच्या घटना या वारंवार घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी आई माता मंदिर परिसरात मोठी आग लागून बिस्कीटाचे गोडाऊन जळून खाक झाले होते.
येवलेवाडीत गोडाऊनमधे भीषण आग; अग्निशमन दलाच्या १२ वाहने घटनास्थळी#punefire#yewalewadifirepic.twitter.com/olg3QYo7b9
— Lokmat (@lokmat) July 14, 2023