धायरी येथील कचरा प्रकल्पास लागली आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 09:52 IST2025-03-14T09:51:53+5:302025-03-14T09:52:51+5:30
या कचरा प्रकल्पाला पहाटे अडीच-तीनच्या सुमारास आग लागल्याचे लक्षात आल्याने सजग नागरिकांनी याबाबत अग्निशमन दलाला कळविले.

धायरी येथील कचरा प्रकल्पास लागली आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
धायरी - सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील एका कचरा प्रकल्पास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला असून प्रकल्पा शेजारी मोठमोठे गृहप्रकल्प आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
नऱ्हे - धायरी रस्त्यावरील पारी कंपनीजवळ असलेल्या या कचरा प्रकल्पाला पहाटे अडीच-तीनच्या सुमारास आग लागल्याचे लक्षात आल्याने सजग नागरिकांनी याबाबत अग्निशमन दलाला कळविले. त्यानंतर अग्निशामन दलाच्या जवळ मिळतात का घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली. आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाचे आनंदनगर केंद्र, नवले केंद्र, कात्रज, एरंडवणा येथील बंब बोलवण्यात आले. त्यानंतर पाण्याचे टँकर देखील बोलवण्यात आले. या ठिकाणी ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. त्यामुळे तेथे कचऱ्याचे खूप मोठे ढीग होते. आग विझवण्याचे काम अजूनही सुरू आहे.
जेसीबी बोलून कचऱ्याचे ढीग काढून, तेथे आग विझवण्याचे काम सुरू आहे. या कचरा प्रकल्पाला लागून अनेक मोठे गृहप्रकल्प आहेत. मात्र, सुदैवाने आग पसरली नाही. ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलास यश आले आहे.नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आली नाही.
याआधीही कचरा प्रकल्पास आग...
जून २०२२ मधेही या कचरा प्रकल्पास अशाच प्रकारे आग लागली होती. कचरा प्रकल्प हा रहिवाशी वस्तीत असल्याने हा प्रकल्प अन्यत्र हलवण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत. तसेच आग लागली की लावली गेली याबाबत नागरिकात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.