Pune Fire : सदाशिव पेठेतील रमेश डाईंग दुकानाला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:35 IST2025-12-09T12:35:18+5:302025-12-09T12:35:28+5:30
धुराच्या प्रचंड प्रमाणामुळे परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीतील काही भाग रिकामे करण्यात आले असल्याची माहिती मिळते.

Pune Fire : सदाशिव पेठेतील रमेश डाईंग दुकानाला भीषण आग
पुणे - सदाशिव पेठ येथील रमेश डाईंग इमारतीच्या टेरेसवर आज अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी जवानांकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, धुराच्या प्रचंड प्रमाणामुळे परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीतील काही भाग रिकामे करण्यात आले असल्याची माहिती मिळते.
पुण्यातील सदाशिव पेठेतील रमेश डाईंग दुकानाला भीषण आग #Fire#Punepic.twitter.com/FFv88vqaVl
— Lokmat (@lokmat) December 9, 2025
अग्निशमन दलाच्या पथकाने आग पसरू नये म्हणून आवश्यक उपाययोजना केल्या असून, आग पूर्णपणे विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती नाही.