EXAM: विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या..! भूकरमापक संवर्गाच्या परीक्षेचा निकाल ३० जानेवारीला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 11:38 IST2026-01-21T11:32:56+5:302026-01-21T11:38:07+5:30

भूकरमापक पदाच्या भरतीसाठी ३४ हजार ५३२ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते.

pune exam news The results of the surveyor cadre exam will be out on January 30. | EXAM: विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या..! भूकरमापक संवर्गाच्या परीक्षेचा निकाल ३० जानेवारीला 

EXAM: विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या..! भूकरमापक संवर्गाच्या परीक्षेचा निकाल ३० जानेवारीला 

पुणे : भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील ९०३ पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल ३० जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विभागाच्या महाभूमी या संकेतस्थळावर हा निकाल उमेदवारांना पाहता येणार आहे, अशी माहिती जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.

भूकरमापक पदाच्या भरतीसाठी ३४ हजार ५३२ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी ३० हजार ६५६ उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली. ही परीक्षा १३ व १४ नोव्हेंबर या दोन दिवसांत प्रत्येकी दोन सत्रांमध्ये घेण्यात आली. पुणे विभागात भूकरमापकांची ८३ पदे असून त्यासाठी २ हजार ९७३ उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली. कोकण विभागातील २५९ जागांसाठी ८ हजार १४८ उमेदवारांनी, नाशिक विभागातील १२४ जागांसाठी ४ हजार ३४० उमेदवारांनी परीक्षा दिली. तर संभाजीनगर विभागातील २१० जागांसाठी ८ हजार २७६ उमेदवारांनी तर, अमरावती विभागातील ११७ जागांसाठी ३ हजार ६७९ उमेदवारांनी आणि नागपूर विभागातील ११० जागांसाठी ३ हजार २४० उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली आहे.

ऑनलाईन परीक्षेस उपस्थित सर्व उमेदवारांचा विभागनिहाय गुणानुक्रमे निकाल ३० जानेवारी रोजी https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर तसेच संबंधित भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही भूमी अभिलेख विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title : भूमि सर्वेक्षक परीक्षा परिणाम 30 जनवरी को: महत्वपूर्ण सूचना!

Web Summary : भूमि अभिलेख विभाग के 903 पदों के लिए भूमि सर्वेक्षक परीक्षा का परिणाम 30 जनवरी को घोषित किया जाएगा। उम्मीदवार महाभूमि.gov.in पर परिणाम देख सकते हैं। नवंबर में विभिन्न प्रभागों में आयोजित ऑनलाइन परीक्षा में 30,000 से अधिक उम्मीदवार उपस्थित हुए।

Web Title : Land Surveyor Exam Results on January 30th: Important Notice!

Web Summary : Land Records Department's surveyor exam results for 903 posts will be declared January 30th. Candidates can view results on mahabhumi.gov.in. Over 30,000 candidates appeared for the online exam held in November across multiple divisions.