Pune: चालकाचे नियंत्रण सुटले, पलट्या खात कार फरफटत गेली, भीषण अपघातात मायलेकासह तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 12:08 IST2023-02-24T12:08:09+5:302023-02-24T12:08:43+5:30

Accident: कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डाळज नं १ येथील बस्थानकाजवळून पाच ते सहा पलट्या घेत २० फूट खोल व महामार्गापासून १५० फूट लांब अंतरावर गेली

Pune: Driver lost control, car overturned, 3 killed including Mother & Son in horrific accident | Pune: चालकाचे नियंत्रण सुटले, पलट्या खात कार फरफटत गेली, भीषण अपघातात मायलेकासह तीन जणांचा मृत्यू

Pune: चालकाचे नियंत्रण सुटले, पलट्या खात कार फरफटत गेली, भीषण अपघातात मायलेकासह तीन जणांचा मृत्यू

- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे - सोलापूर हायवे वरती इंदापूर तालुक्यातील डाळज नं. १ तेथे स्विफ्ट डिझायर MH43BN1402 या गाडीचा भीषण अपघात झाला असून गाडी चालकासह तीन जणांचा मृत्यू झाला असून, एकास गंभीर दुखापत झाली आहे.

भिगवन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे (दिनांक २४) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर डाळज नं १ तेथे सोलापूर पुणे लेनवर लातूर हुन पुणे च्या दिशेने चंद्रकांत गवळी यांच्या होणाऱ्या जावई च्या नवीन घराच्या वास्तुशांती साठी लातूर होऊन पुण्याला जात असताना स्विफ्ट डिझायर MH43BN1402 कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डाळज नं १ येथील बस्थानकाजवळून पाच ते सहा पलट्या घेत २० फूट खोल व महामार्गापासून १५० फूट लांब अंतरावर गेली.

या अपघातामध्ये  संदीप राजाभाऊ माळी (वय ३५ वर्षे रा. गातेगाव ता.जि लातूर), बालाजी केरबा तिडके (वय 48 वर्षे रा महावीर सोसायटी, लातूर ता जि लातूर),  सरस्वती राजाभाऊ माळी (वय 61 वर्षे रा. गातेगाव ता.जि. लातूर)  हे मृत्यू पावले.  तर चंद्रकांत रामकिसन गवळी (वय 54 वर्षे, व्यवसाय नोकरी रा. दिपज्योतीनगर ता. जि लातूर)  यांना गंभीर दुखापत झाली आहे.

Web Title: Pune: Driver lost control, car overturned, 3 killed including Mother & Son in horrific accident