Ssc Result 2020: हवा कुणाची पुणेकरांची ! विभागात पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याची विभागात 'सरशी'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 04:27 PM2020-07-29T16:27:19+5:302020-07-29T18:02:05+5:30

बारावीच्या निकालात विभागात पिछाडीवर पडलेल्या पुण्याने दहावीच्या निकालामध्ये सगळीकडे कसर भरून काढली

Pune district tops in ssc exam result from the division | Ssc Result 2020: हवा कुणाची पुणेकरांची ! विभागात पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याची विभागात 'सरशी'

Ssc Result 2020: हवा कुणाची पुणेकरांची ! विभागात पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याची विभागात 'सरशी'

Next
ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ९७.९३ टक्के लागला असून एकुण १ लाख २२ हजार १७५ विद्यार्थी उत्तीर्णराज्याच्या निकालाप्रमाणेत विभागातही मुलींचीच बाजी

पुणे : इयत्ता बारावीच्या निकालात पुणे विभागात पिछाडीवर पडलेल्या पुणे जिल्ह्याने दहावीच्या निकाल अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्ह्याचा निकाल ९७.९३ टक्के लागला असून एकुण १ लाख २२ हजार १७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सोलापुर जिल्ह्यातील ९७.५३ आणि अहमदनगर मधील ९६.१० टक्के विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाचा एकुण निकाल ९७.३४ टक्के इतका लागला आहे. विभागात एकुण २ लाख ५७ हजार ८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २ लाख ५० हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर १ लाख २ हजार २८२ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी व ९२ हजार ५८९ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे. विभागात पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक १ लाख २५ हजार १६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख २२ हजार १७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सोलापुर जिल्ह्यातील ६३ हजार १९३ विद्यार्थ्यांपैकी ६१ हजार ६३३ विद्यार्थी तर नगर जिल्ह्यातील ६९ हजार ५३ पैकी ६६ हजार ३६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

राज्याच्या निकालाप्रमाणेत विभागातही मुलींनीच बाजी मारली आहे. परीक्षेला बसलेल्या एकुण १ लाख १६ हजार ४५२ मुलींपैकी १ लाख १८ हजार ४१९ मुली उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.३३ एवढी आहे. तर १ लाख ३३ हजार ७१६ मुले उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी ९६.४८ एवढी आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ५९ हजार ६९७ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ९८.६२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 
-----------
विभागनिहाय निकाल
जिल्हा परीक्षेला बसलेले उत्तीर्ण टक्केवारी
पुणे १,२४,७८२ १,२२,१७५ ९७.९३
अहमदनगर ६९,०५३ ६६,३६० ९६.१०
सोलापूर ६३,१९३ ६१,६३३ ९७.५३
------------------------------------------------------
एकुण २,५७,००८ २५,०१६८ ९७.३४
--------------------------------------------------------
मुले व मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी
जिल्हा मुले मुली
पुणे ९७.२८ ९८.६२
अहमदनगर ९४.९१ ९७.५९
सोलापूर ९६.७२ ९८.५१
-----------------------------------

 

Web Title: Pune district tops in ssc exam result from the division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.