शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

जिल्हा पुन्हा अजितदादांच्या ताब्यात ; चंद्रकांत पाटलांना आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 6:00 AM

राष्ट्रवादीमधून बंड केल्यानंतरही उपमुख्यमंत्री व आता पुण्याचे पालकमंत्री झालेले अजित पवार सध्या तरी चंद्रकांत पाटील यांना भारी पडले आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार तीन वेळा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील अजित पवार यांना आवाज देतील की शांत बसतील याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता

राजू इनामदार - 

पुणे: पाच वर्षांच्या खंडानंतर पुणे जिल्हा पुन्हा अजित पवार यांच्याच ताब्यात आला आहे. महाविकास आघाडीने अपेक्षेप्रमाणे पुणे जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची जबाबदारी पवार यांच्याकडेच सोपवली आहे. कोल्हापूरातून पुण्यात आलेल्या व कोथरूडमधून आमदार झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या चंद्रकांत पाटील यांच्यापुढे यातून आव्हान उभे राहणार आहे. राष्ट्रवादीमधून बंड केल्यानंतरही उपमुख्यमंत्री व आता पुण्याचे पालकमंत्री झालेले अजित पवार सध्या तरी चंद्रकांत पाटील यांना भारी पडले आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार तब्बल तीन वेळा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका शिवाय जिल्हा परिषदेतही त्यांचे वर्चस्व होते. त्या माध्यमातून त्यांनी दोन्ही महापालिकांमध्ये व जिल्ह्यातही अनेक चांगल्या कामांना गती दिली. सन २०१४ नंतरच्या त्यांच्या कार्यकाळात राज्यात भाजपाची सत्ता व महापालिकेत राष्ट्रवादीची असे होऊनही त्यांनी विकासकामांवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही.

कामांचा तोच धडाका आता अजित पवार पुन्हा लावणार का असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर आहे. राज्यात त्यांची सत्ता असली तरी पुणे व  पिंपरी-चिंचवड पालिकेत आता भाजपाची सत्ता आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये राज्याकडून या दोन्ही पालिकांना सहकार्य मिळणार का अशी उत्सुकता आहे. अजित पवार यांना जवळून ओळखणाºयांच्या मते विकासकामात दादा कधीही राजकारण करत नाहीत, त्यामुळे उलट आता या दोन्ही शहरांमध्ये तसेच जिल्ह्यातही रखडलेल्या कामांना नक्की गती मिळणार आहे.  पवार यांची प्रशासनावर चांगली पकड आहे. कामचुकारपणा करणाºया, नियमांचे, कायद्याचे अवडंबर माजवणाºया अधिकाºयांना ते बरोबर कामाला लावतील असे बºयाच कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पवार व पाटील दोघांनाही राजकारणात दादा असेच संबोधले जाते. त्यामुळे दोन दादांमध्ये कोणते दादा भारी असा प्रश्न यातून निर्माण होणार आहे. राज्यात सत्ता येणारच अशा खात्रीने चंद्रकात पाटील यांना भाजपाने कोल्हापूरहून पुण्यात आणले. कोथरूड सारख्या सुरक्षीत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. निवडूनही आणले. त्यानंतर तेच पालकमंत्री होणार अशी हवा होती, मात्र राजकारणाचे फासेच असे पडले की चंद्रकात पाटील यांना आता विरोधी आमदार इतकीच जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली आहे. तरीही दोन महापालिका ताब्यात व केंद्र सरकारचे पाठबळ या ताकदीवर पाटील अजित पवार यांना आवाज देतील की शांत बसतील याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस