Pune Grand Tour : डेक्कनमध्ये पुणे ग्रॅण्ड टूरदरम्यान सायकलपटूंचा अपघात; वादाचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 12:29 IST2026-01-24T12:25:19+5:302026-01-24T12:29:06+5:30

काही काळ सायकलपटूंमध्ये वादावादी झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Pune Cyclists' accident during Pune Grand Tour in Deccan; Video of controversy goes viral | Pune Grand Tour : डेक्कनमध्ये पुणे ग्रॅण्ड टूरदरम्यान सायकलपटूंचा अपघात; वादाचा व्हिडिओ व्हायरल

Pune Grand Tour : डेक्कनमध्ये पुणे ग्रॅण्ड टूरदरम्यान सायकलपटूंचा अपघात; वादाचा व्हिडिओ व्हायरल

पुणे -पुणे ग्रॅण्ड टूर सायकल स्पर्धेदरम्यान शुक्रवारी दुपारी डेक्कन परिसरात सायकलपटूंमध्ये अपघात झाल्याची घटना घडली. संभाजी महाराज पुतळ्याजवळील मार्गावर हा अपघात झाला असून त्यानंतर काही काळ सायकलपटूंमध्ये वादावादी झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अपघातानंतर काही सायकलपटूंमध्ये शाब्दिक वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर स्पर्धा पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली. व्हायरल व्हिडिओवर नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी आयोजकांच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.



दरम्यान, पुण्यातील ऐतिहासिक भागातून मार्गस्थ झालेल्या पुणे ग्रॅण्ड टूर सायकल स्पर्धेच्या ९५ किलोमीटर अंतराच्या अखेरच्या ‘पुणे प्राइड लूप’ टप्प्यात आंतरराष्ट्रीय सायकलपटूंनी दमदार कामगिरी केली. शुक्रवारी झालेल्या अंतिम टप्प्यात ली निंग स्टार संघाच्या श्नायर्को ॲलिक्सेईने १ तास ५६ मिनिटे ५४ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला.

दोन टप्प्यांतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ल्यूक मडग्वेने संपूर्ण पुणे ग्रॅण्ड टूरचे विजेतेपद पटकावले. तर ली निंग स्टार संघाने सांघिक विजेतेपदावर आपले नाव कोरले. अपघाताची घटना घडूनही स्पर्धेचा उत्साह कायम राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Web Title : पुणे ग्रैंड टूर: डेक्कन चरण में साइकिल सवार दुर्घटनाग्रस्त, वीडियो वायरल

Web Summary : पुणे ग्रैंड टूर के डेक्कन चरण में साइकिल सवारों की टक्कर हो गई, जिससे विवाद हुआ। पुलिस ने हस्तक्षेप किया। दुर्घटना के बावजूद, दौड़ जारी रही, जिसमें अंतर्राष्ट्रीय साइकिल चालकों ने उत्कृष्ट प्रदर्शन किया। ल्यूक मडग्वे ने समग्र रूप से जीत हासिल की।

Web Title : Pune Grand Tour: Cyclist Accident During Deccan Leg, Video Goes Viral

Web Summary : Cyclists collided during Pune Grand Tour's Deccan leg, sparking arguments. Police intervened. Despite the accident, the race continued, with international cyclists excelling. Luke Mudgwe won overall.