शेतकऱ्यांनो सावधान..! ‘पीएम किसान एपीके फाईल डाऊनलोड करू नका’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:37 IST2025-03-18T13:36:30+5:302025-03-18T13:37:55+5:30
शेतकऱ्यांनी अज्ञात एपीके फाईल किंवा लिंक डाऊनलोड करू नये

शेतकऱ्यांनो सावधान..! ‘पीएम किसान एपीके फाईल डाऊनलोड करू नका’
पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर PM Kisan list. APK किंवा PM Kisan APK या संदेशाची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होते, अशा तक्रारी वाढत आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी अज्ञात एपीके फाईल किंवा लिंक डाऊनलोड करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळ आणि ॲपचाच वापर करावा. कोणतीही अज्ञात APK फाईल किंवा लिंक डाउनलोड करू नये. संशयास्पद लिंक आणि संदेशापासून सावध राहावे.
कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेला पीएम-किसान संबंधित लिंक उघडू नये. अनोळखी कॉलवर बँक खाते किंवा आधार क्रमांक सांगू नये. फसवणूक झाल्यास सायबर गुन्हे तक्रार संकेतस्थळ https://cybercrime.gov.in वर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.