Pune Crime: रागाने बघत असल्याचा बहाणा करून तरुणाला लुटले, विमाननगर येथील घटना
By नितीश गोवंडे | Updated: January 17, 2024 15:38 IST2024-01-17T15:37:58+5:302024-01-17T15:38:31+5:30
याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून...

Pune Crime: रागाने बघत असल्याचा बहाणा करून तरुणाला लुटले, विमाननगर येथील घटना
पुणे : पायी जाणाऱ्या तरुणाला रागाने का बघतो असे म्हणून मारहाण करत २ हजार रुपये काढून घेतल्याची घटना विमान नगर भागात घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत गौरव अमर सुतार (२१, संजयपार्क, विमान नगर) यांनी विमान नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार साजिद वहिद अब्दुल (१९, संजयपार्क, विमान नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना ११ जानेवारी रोजी रात्री १२ च्या सुमारास संजीवन बेकरी विमान नगर येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव सुतार हा पायी जात असताना साजिद आणि त्याचा साथीदाराने आमच्याकडे रागाने का बघतो असे म्हणून गौरवला मारहाण केली. येथून जायचे असेल तर आम्हाला ५ हजार द्यावे लागतील असे सांगून त्याच्या पाकिटातील रोख १६०० रुपये आणि ऑनलाईन १ हजार असे २ हजार ६०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय चंदन करत आहेत.