शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाने ब्रेकअपनंतर केले प्रेयसीचे अश्लील फोटो व्हायरल; मैत्रिणीच्या फोटोवर केले नको ते कमेंट अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:56 IST

मैत्रीण आणि आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. मागील दोन महिन्यांमध्ये त्यांच्यामध्ये अंतर्गत वादावादी झाल्याने ब्रेकअप झाले होते.

लोणी काळभोर - ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीचे अश्लील फोटो तर तिच्या मैत्रिणीच्या फोटोवर अश्लील कमेंट करून सोशल मिडीयावर व्हायरल केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर परिसरात घडली असून याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर सोमवारी (दि. १७) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत उमाकांत कोळी (रा. मांजरी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत ही लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित शैक्षणिक संकुलात व्यावसायिक शिक्षण घेत आहे. तर तिची मैत्रीणही त्याच संकुलात शिक्षण घेत आहे. दोघीही लोणी काळभोर परिसरात पिजीमध्ये राहतात.दरम्यान, फिर्यादी यांची मैत्रीण आणि आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. मागील दोन महिन्यांमध्ये त्यांच्यामध्ये अंतर्गत वादावादी झाल्याने ब्रेकअप झाले होते. आरोपीला हे ब्रेकअप फिर्यादी यांच्यामुळे झाल्याचा संशय होता.आरोपी हा फिर्यादी यांच्या मैत्रिणीसोबत पुन्हा प्रेमसंबंध प्रस्तापित करण्यासाठी प्रयत्न करीत होता. मात्र काहीही केले तरी त्याची प्रेयसी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार देत होती.याचाच राग मनात धरून आरोपीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट फिर्यादीचा फोटो ठेवुन त्याखाली अश्लील कमेंट केली. तसेच फिर्यादी व फिर्यादीची मैत्रिण यांची नावे टाकुन अश्लील कमेंट केलेली स्टोरी ठेवुन पोस्ट व्हायरल केली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या व्हॉटसअॅप नंबर वर फिर्यादी यांच्या मैत्रिणीचे अश्लील फोटो टाकुन फिर्यादीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन त्यांचा विनयभंग केला आहे. अशी फिर्याद लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.  याप्रकरणी एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या