तोंडाला रुमाल, हातात कोयते..! पुण्यातील कॅफे बाहेर फोडली वाहनं

By किरण शिंदे | Updated: May 29, 2025 12:24 IST2025-05-29T12:23:41+5:302025-05-29T12:24:34+5:30

हा सगळा प्रकार नेमक्या कुठल्या वादातून आणि कुठल्या कारणाने घडला हे अद्याप समजू शकलेले नाही. ही सर्व घटना सी सी टिव्ही मध्ये कैद झाली आहे

pune crime With a handkerchief on his face, a scythe in his hand..! Vehicles smashed outside a cafe in Pune | तोंडाला रुमाल, हातात कोयते..! पुण्यातील कॅफे बाहेर फोडली वाहनं

तोंडाला रुमाल, हातात कोयते..! पुण्यातील कॅफे बाहेर फोडली वाहनं

पुणे - पुण्यातील डी पी रस्त्यावर रात्री उशिरा सुरू असलेल्या कॅफे च्या बाहेर तीन तरुणांनी कोयता, पालघन सारख्या हत्यार नाचवत आणि एका वाहनाची तोडफोड करत दहशत माजवल्याचा प्रकार घडला. मंगळवारी रात्री १२ वाजता हा सगळा प्रकार घडला. विशेष म्हणजे ३ दिवस उलटल्यानंतर सुद्धा याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात याप्रकरणी ना कुठली तक्रार ना कुठला गुन्हा आत्तापर्यंत दाखल झाला आहे. हा सगळा प्रकार नेमक्या कुठल्या वादातून आणि कुठल्या कारणाने घडला हे अद्याप समजू शकलेले नाही. ही सर्व घटना सी सी टिव्ही मध्ये कैद झाली आहे

२७ मे रोजी रात्री १२ वाजता पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या डी पी रस्त्यावर एक कॅफे उशिरापर्यंत सुरू होतं. अचानक तिथे तीन तरुण एका दुचाकीने आले. त्यांच्या तोंडावर रुमाल आणि हातात कोयता, पालघन सारखे हत्यार होते. ही सर्व घटना सी सी टिव्ही मध्ये कैद झाली आहे. या परिसरातील सी सी टिव्ही मध्ये कैद झालेल्या दृश्यांनुसार, तीन तरुण हातात हत्यार घेऊन रात्री. १२ वाजता सुरू असलेल्या कॅफे मध्ये शिरले आणि अवघ्या १.५ मिनिटात बाहेर आले. बाहेर येताच त्यांनी हातातील हत्यारे नाचवली आणि पार्किंग मध्ये असलेल्या दुचाकीवर हल्ला केला. चित्रित झालेल्या घटनेत सुदैवाने कोणी ही जखमी झाला नाही.

या घटनेला आता ३ दिवस उलटले असले तरी सुद्धा संबंधित प्रकरणावर पोलिसांनी कुठली कारवाई केली आहे का? या प्रकरणी अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे का? कॅफे चालकाने संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे का याबाबत कुठलीही माहिती समोर आलेलेली नाही.

Web Title: pune crime With a handkerchief on his face, a scythe in his hand..! Vehicles smashed outside a cafe in Pune