Pune Crime: ‘पेंटिंगचे ब्रश कचऱ्यात का फेकले?’; पतीकडून पत्नीवर लोखंडी स्टँडने हल्ला; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:50 IST2026-04-09T15:47:22+5:302026-04-09T15:50:42+5:30

Pune Crime - वाद तीव्र झाल्यानंतर संतापाच्या भरात त्याने घरातील गॅस शेगडीवर ठेवलेला लोखंडी स्टँड उचलून पत्नीच्या डोक्यात जोरदार हल्ला केला

Pune Crime Why did you throw the painting brush in the trash? Husband beats wife Case registered | Pune Crime: ‘पेंटिंगचे ब्रश कचऱ्यात का फेकले?’; पतीकडून पत्नीवर लोखंडी स्टँडने हल्ला; गुन्हा दाखल

Pune Crime: ‘पेंटिंगचे ब्रश कचऱ्यात का फेकले?’; पतीकडून पत्नीवर लोखंडी स्टँडने हल्ला; गुन्हा दाखल

पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘पेंटिंगचे ब्रश कचऱ्यात का फेकले?’ या किरकोळ कारणावरून हा प्रकार घडला असून, जखमी महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

काळेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (६ एप्रिल) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पवारनगर कॉलनी, थेरगाव येथे घडली. या प्रकरणी किशोर सुभाष वाघमारे (वय ३५, रा. थेरगाव) याला अटक करण्यात आली आहे.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर वाघमारे हा दारूच्या नशेत घरी आला आणि पत्नीशी वाद घालू लागला. पेंटिंगचे ब्रश कचऱ्यात फेकल्याचा संशय घेत त्याने पत्नीला शिवीगाळ केली. वाद तीव्र झाल्यानंतर संतापाच्या भरात त्याने घरातील गॅस शेगडीवर ठेवलेला लोखंडी स्टँड उचलून पत्नीच्या डोक्यात जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेने काळेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.

Web Title : पुणे: पेंटब्रश फेंकने पर पति ने पत्नी पर हमला किया; गिरफ्तार।

Web Summary : पिंपरी-चिंचवड: पेंटब्रश फेंकने के कारण एक आदमी ने अपनी पत्नी पर हमला किया। उसने धातु के स्टैंड से उसके सिर पर मारा। पुलिस ने पति को गिरफ्तार कर लिया।

Web Title : Pune: Husband attacks wife over thrown paintbrushes; arrested.

Web Summary : Pimpri-Chinchwad: A man attacked his wife for throwing away paintbrushes. He struck her head with a metal stand. Police arrested the husband.