उसने पैसे देवाण-घेवाणीवरून झाले किरोकोळ वाद; हॉटेल चालकाच्या मानेत चाकू खूपसून वेटरने केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 15:07 IST2025-08-27T15:06:27+5:302025-08-27T15:07:01+5:30

पहिल्या दोन वेळा शेट्टी यांनी त्याला पैसे दिले परंतु वारंवार त्याने पैसे मागायला सुरवात केली, त्यामुळे शेट्टी यांनी त्याला आधी काम चांगले कर मगच पैसे देईल असे सांगितले आणि पैसे देण्याचे टाळले. त्यामुळे उमेशला शेट्टी यांचा राग आला होता.

pune crime waiter kills hotel owner by stabbing him in the neck | उसने पैसे देवाण-घेवाणीवरून झाले किरोकोळ वाद; हॉटेल चालकाच्या मानेत चाकू खूपसून वेटरने केला खून

उसने पैसे देवाण-घेवाणीवरून झाले किरोकोळ वाद; हॉटेल चालकाच्या मानेत चाकू खूपसून वेटरने केला खून

पुणे :पुणे उसन्यापैशाच्या किरकोळ कारणावरून हॉटेलमधील वेटरने हॉटेल चालकाच्या मानेत चाकू भोसकून त्याचा खून केला. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कोंढवे धावडे परिसरातील पीकॉक फॅमिली गार्डन, बार ॲण्ड लॉजिंग येथे घडली. संतोष सुंदर शेट्टी (वय ४५) असे खून झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आह, तर वेटर उमेश दिलीप गिरी (वय ३९, रा. कात्रज) याला कोंढवे-धावडे पोलिसांनी खूनप्रकरणी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, संतोष शेट्टी यांनी कोंढवे धावडे येथील हॉटेल पीकॉक हे चालविण्यासाठी घेतले होते. २५ दिवसांपूर्वी उमेश गिरी हा त्यांच्याकडे वेटरच्या कामासाठी आला होता. तेंव्हा पासून तो हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. काम सुरु केल्यापासून दर चार-पाच दिवसांनी तो शेट्टी यांना उधारीवर पैसे मागत होता. पहिल्या दोन वेळा शेट्टी यांनी त्याला पैसे दिले परंतु वारंवार त्याने पैसे मागायला सुरवात केली, त्यामुळे शेट्टी यांनी त्याला आधी काम चांगले कर मगच पैसे देईल असे सांगितले आणि पैसे देण्याचे टाळले. त्यामुळे उमेशला शेट्टी यांचा राग आला होता. त्यातून चार दिवसांपूर्वी त्यांची किरकोळ भांडणेही झाली होती. आज रात्री आठच्या सुमारास शेट्टी हॉटेलमध्ये बसले होते. त्यानंतर पुन्हा उमेशने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली, शेट्टी यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे उमेश आणि संतोष यांच्यात किरकोळ वादावादी झाली. त्यानंतर उमेश शांतपणे किचनच्या दिशेने गेला.

किचनमधील चाकू घेऊन शांतपणे संतोष यांच्या मागून त्यांच्याजवळ आला. संतोष बेसावध असताना पाठीमागून त्यांच्या मानेत त्याने चाकू खुपसला. त्यामुळे संतोष हे क्षणात खाली कोसळले. त्यांच्या गळ्यातून रक्ताच्या धारा वहायला लागल्या. हॉटेलमधील इतर कर्मचारी व ग्राहकांनी संतोष यांना तातडीने माई मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

२५ दिवसांपूर्वीच कामावर
उमेश गिरी हा केवळ २५ दिवसांपूर्वीच या हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला लागला होता. त्यापूर्वी त्याची आणि हॉटेल चालक संतोष शेट्टी यांची ओळख नव्हती. संतोष यांनीच उमेशला हॉटेलमध्ये वेटर पदावर कामाला ठेवले होते. 

खून केल्यावरही हॉटेलमध्येच थांबला
संतोष याच्या मानेत चाकू खूपसून त्याचा खून केल्यावरही उमेश हा तेथून पळून गेला नाही की घाबरला नाही, तो शांतपणे तेथेच उभा राहिला, त्यानंतर पोलिसांनी त्याला तेथेच अटक केली.

Web Title: pune crime waiter kills hotel owner by stabbing him in the neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.