लोणी काळभोर (पुणे) : कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून लोणी काळभोर येथील ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब श्रीपती वनवे यांना पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, लोणी काळभोर यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकारी कार्यरत असताना कर्तव्य पार पाडताना अक्षम्य हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ (१)(अ) अंतर्गत अधिकार वापरत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच नियम ८ नुसार त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात आली आहे.निलंबन काळात बाळासाहेब वनवे यांचे मुख्यालय जुन्नर तहसील कार्यालय येथे निश्चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत संबंधित अधिकाऱ्याने कोणतीही खाजगी नोकरी स्वीकारू नये किंवा व्यवसाय करू नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसे आढळल्यास पुढील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल आणि निलंबन निर्वाह भत्ताही रोखला जाऊ शकतो. नियमांनुसार निलंबन कालावधीत त्यांना निलंबन निर्वाह भत्ता व पूरक भत्ते मिळतील. मात्र प्रत्येक वेळी भत्ता घेण्यापूर्वी त्यांनी खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.विभागीय चौकशीचा प्रस्ताव एका महिन्याततहसीलदार, लोणी काळभोर यांना आदेशाची मूळ प्रत संबंधित अधिकाऱ्यांना देऊन त्यांची स्वाक्षरी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या दप्तराची तपासणी करून एका महिन्याच्या आत विभागीय चौकशीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Web Summary : Balasaheb Vanve, a revenue officer from Loni Kalbhor, has been suspended by the Pune District Collector due to negligence. A departmental inquiry is proposed, and he is restricted to Junnar Tehsil office during suspension. He must declare he's not working to get allowance.
Web Summary : लोनी कालभोर के राजस्व अधिकारी बालासाहेब वनवे को लापरवाही के कारण पुणे जिला कलेक्टर ने निलंबित कर दिया। विभागीय जांच प्रस्तावित है, और निलंबन के दौरान उन्हें जुन्नर तहसील कार्यालय तक सीमित कर दिया गया है। भत्ते के लिए उन्हें यह घोषित करना होगा कि वे काम नहीं कर रहे हैं।