शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

थेऊर गोळीबार प्रकरण : मुख्यआरोपीस अप्रत्यक्षरीत्या मदत करणारा पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके निलंबित  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:47 IST

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता मात्र या तपास नवी अपडेट समोर येत आहे.

लोणी काळभोर - महिलेच्या डोक्यात दगड मारून, तसेच पतीवर पिस्तुलातून गोळीबार करून पसार झालेले सर्व आरोपींना अटक झाली असून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दगड मारल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.दरम्यान या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेल्या गुन्हेगारास स्थानिक पोलिसाने मदत केल्याची धक्कादायक माहिती उघडीस आली आहे. तपासात पोलिसाने गुन्हेगारास अप्रत्यक्षरित्या मदत केल्याचे तपासात पुढे आल्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कर्तव्यास असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी काढला आहे.लोणी काळभोर पोलीस ठाण्यात थेऊर येथील दाखल गुन्ह्यातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी थेऊर येथील घडलेल्या गुन्ह्यातील  मुख्य आरोपी भरत जैद याला  अप्रत्यक्षरित्या मदत केली आहे.  हा गुन्हा घडला त्यावेळी घटनास्थळी हजर नव्हता, असे साक्षीदार सुदर्शन यशवंत आगळने व प्रतिक रमेश बिटे यांचे तपास टिपणांमध्ये नमुद करुन ती तपास टिपणे गुन्हयाचे कागदपत्रांत समाविष्ठ केली आहेत. परंतु लोणी काळभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केलेल्या तपासादरम्यान भरत जैद हा घटना घडली त्यावेळी घटनास्थळी हजर असलेचे सबळ पुरावे प्राप्त झाले आहेत.घोडके यांनी बारामती येथील तिरुपती हॉटेलचे सी.सी.टी.व्ही. फुटेज गुन्हात जप्त करून भरत जैद बारामतीवरून पुण्याचे दिशेने येताना त्याचे इतर ७ साथीदार यांचेसोबत काळ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीमध्ये आला नसुन, तो सुदर्शन आगळमे यांचेसोबत त्यांचेकडील शेवोरलेट गाडीमध्ये बसुन आला होता. त्यानंतर तो थेऊर मार्गे न जाता हडपसर, विश्रांतवाडी मार्गे गेला होता, असे निष्पन्न करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तपासादरम्यान भरत जैद हा गुन्ह्यात जप्त केलेल्या काळ्या रंगाचे फॉर्च्यूनर गाडीमध्ये बसून सुपा पोलीस ठाणे येथून त्याचे इतर ७ साथीदार यांचेसह निघाला होता.मोशी येथे थेऊर, केसनंद मार्गेच गेला असल्याचे सबळ पुराने प्राप्त झाले आहेत. यावरुन पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी आरोपीस आप्रत्यक्षरित्या सहकार्य करण्याचे दृष्टीने मदत केल्याचे निष्पन्न होत असल्याचे या आदेशात नमूद केले आहे. घोडके यांना निलंबन कालावधीत कोणतीही खाजगी नोकरी करता येणार नाही आणि त्यांनी दररोज शिवाजीनगर येथील पुणे पोलीस मुख्यालय राखीव पोलीस निरीक्षक यांच्याकडे हजेरीसाठी उपस्थित राहावे असे आदेश दिले आहेत.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या