शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...

By किरण शिंदे | Updated: June 15, 2025 12:41 IST

पोलिसांनी वर जाताच घराचा दरवाजा वाजवला. मात्र दरवाजा कोणीही उडत नव्हते. काही वेळाने घरातून त्याच्या बायकोने कोण आहे म्हणून विचारले. त्यानंतर पोलिसांसोबत असलेल्या त्या महिलेने मी असल्याचे सांगत दरवाजा उघडण्यास सांगितले.

पुणे - पुण्यातील सराईत गुंड शाहरुख उर्फ अट्टि रहीम शेख याचा मध्यरात्री पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. टिपू पठाण टोळीचा सदस्य असलेला शाहरुख मोका कारवाई झाल्यानंतर फरार झाला होता. पुणेपोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. मात्र त्याचा ठाव ठिकाण लागत नव्हता.

अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांना तो लांबोटी गावात नातेवाईकाच्या घरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गणेशाची काही पथक त्याला पकडण्यासाठी मध्यरात्री लांबोटी गावातील त्या घरात पोहोचली. मात्र पोलीस पकडण्यासाठी आल्याचे समजतात शाहरुखने शरणागती पत्करण्याऐवजी पोलिसांवरच बंदूक रोखली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शाहरुखचा मृत्यू झाला.कसा होता गोळीबाराचा थरार?फरार झालेला शाहरुख लांबोटी गावातील मावस भावाच्या घरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक शनिवारी मध्यरात्री लांबोटी गावात पोहोचले. गावातील दोन मजली असलेल्या त्या घरात जाऊन पोलिसांनी शाहरुखचा फोटो दाखवत विचारले असता एका महिलेने हा व्यक्ती इथेच  टेरेसवर असलेल्या छोट्या खोलीत राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला घेऊनच टेरेस गाठले. टेरेसवर असलेल्या छोट्या खोलीत शाहरुख त्याच्या पत्नीसोबत राहत होता.पोलिसांनी वर जाताच घराचा दरवाजा वाजवला. मात्र दरवाजा कोणीही उडत नव्हते. काही वेळाने घरातून त्याच्या बायकोने कोण आहे म्हणून विचारले. त्यानंतर पोलिसांसोबत-असलेल्या त्या महिलेने मी असल्याचे सांगत दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यानंतर शाहरुखच्या पत्नीने दरवाजा उघडला.. दरवाजा उघडताच पोलिस आत घुसले. पोलीस आल्याचे पाहताच शाहरुखने बंदूक काढून पोलिसांवर ताणली. तर छोट्या घरात शाहरुखसह दोन ते तीन लहान मुले ही होती. शाहरुखने सुरुवातीला या मुलांना ढाल बनवण्याचा प्रयत्न करत पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. त्यानंतर मात्र पोलिसांनी लहान मुलांचा बचाव करत शाहरुखच्या दिशेने गोळी झाडली. ती गोळी थेट शाहरुखच्या मांडीवर जाऊन लागली. मात्र तरीसुद्धा शाहरुखने त्याच्याजवळची बंदूक पोलिसांच्या दिशेने रोखली होती. त्यानंतर मात्र पोलिसांनी पुन्हा गोळ्या झाडल्या आणि शाहरुख आडवा पडला. तातडीने त्याला सोलापुरातील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.दरम्यान शाहरुखला नेमक्या किती गोळ्या लागल्या याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर त्याचे तपशील समोर येतील. मात्र सराईत गुन्हेगाराचा एन्काऊंटरमध्ये खात्मा झाल्याने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे. शाहरुख हा पुण्यातील टिपू पठाण टोळीचा सक्रिय सदस्य होता. टिपू पठाण टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे. या टोळीवर खंडणी, बेकायदेशीर धंदे, दहशत निर्माण करणे, वसुली करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर शाहरुख याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोका कारवाई झाल्यानंतर तो फरार होता.

टॅग्स :PuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSolapurसोलापूर