Pune Crime : ग्रामीण पोलिसांकडून आरोपींचे स्केच जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 16:19 IST2025-07-02T16:14:02+5:302025-07-02T16:19:01+5:30

पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ते दौंड जवळील स्वामी चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी या वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली.

pune crime ten teams of rural police deployed to catch the murderers Sketches of the accused released by Pune Rural Police. | Pune Crime : ग्रामीण पोलिसांकडून आरोपींचे स्केच जाहीर

Pune Crime : ग्रामीण पोलिसांकडून आरोपींचे स्केच जाहीर

पुणे - पुण्याजवळील दौंड परिसरात पंढरपूरसाठी निघालेल्या  वारकऱ्यांना कोयत्याच्या धाकाने लुबाडल्याची घटना घडली होती. एकच नाही तर वारकऱ्यांसोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारही करण्यात आले. याप्रकरणी दोन अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपींना पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची दहा वेगवेगळी पथक तैनात करण्यात आली आहेत.

पुणे ग्रामीण भागातील सराईत गुन्हेगार, संशयित गुन्हेगार यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. त्यासाठी ग्रामीण पोलिसांनी या दोन्ही आरोपींचे स्केच तयार केले आहेत. आणि त्या आधारे तपास सुरू आहे. तर आज वारकऱ्याची लूट आणि अतिप्रसंग प्रकरणातील आरोपीचे रेखाचित्र (स्केच ) पुणे ग्रामीण पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वारकऱ्यांचा एक टेम्पो सोमवारी मध्यरात्री पंढरपूरच्या दिशेने निघाला होता. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ते दौंड जवळील स्वामी चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी या वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली.

त्यांच्यासोबत असणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले. इतकच नाही तर याच वारकऱ्यांसोबत असणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीला चहाच्या टपरीमागे घेऊन जात तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. पंढरपूरच्या वारी दरम्यान घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: pune crime ten teams of rural police deployed to catch the murderers Sketches of the accused released by Pune Rural Police.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.