पुणे : बाणेर परिसरात ड्रग्ज तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी अत्यंत चलाखीने हळदीच्या पाकिटांमध्ये गांजा लपवून विक्री करत होते. बाणेर पोलिसांनी सापळा रचून दोन सख्ख्या भावांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, दोन भाऊ हळदीच्या पाकिटांमध्ये गांजा भरून त्याची विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री दोनच्या सुमारास परिसरात सापळा लावला. यावेळी मोटारसायकलवर बसून ग्राहकाची वाट पाहत असलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. झडती घेतली असता त्यांच्या जवळून सुमारे ३ किलो गांजा आढळून आला.
यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची तपासणी केली असता आणखी १३ किलो गांजा आणि काही विदेशी चलन जप्त करण्यात आले. या प्रकरणी अभिषेक बोरसे (वय २४) आणि अक्षय बोरसे या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवासी असून मोटारसायकलच्या साहाय्याने विविध भागांत जाऊन ड्रग्जची विक्री करत असल्याचे समोर आले आहे.
पोलिस तपासात आरोपी अनेक दिवसांपासून अशाच पद्धतीने हळदीच्या पाकिटांत गांजा लपवून विक्री करत होते ही बाब समोर आली आहे. जेणेकरून पोलिस आणि नागरिकांच्या नजरेतून ते सुटू शकतील. दोघेही एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती असून ते गांजा नेमका कुठून आणत होते, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Web Summary : Pune police arrested two brothers in Baner for selling marijuana hidden in turmeric packets. Authorities seized 16 kg of marijuana and foreign currency. The accused, employed in a private company, used motorcycles for distribution. Investigation ongoing to determine the source of the drugs.
Web Summary : पुणे पुलिस ने बानेर में हल्दी के पैकेट में गांजा छुपाकर बेचने वाले दो भाइयों को गिरफ्तार किया। पुलिस ने 16 किलो गांजा और विदेशी मुद्रा जब्त की। आरोपी एक निजी कंपनी में कार्यरत थे और वितरण के लिए मोटरसाइकिल का उपयोग करते थे। पुलिस मामले की जांच कर रही है।