तिच्या पोटावर ठोसा मारला;चारित्र्याच्या संशयावरून गभर्वती पत्नीला बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 19:32 IST2025-07-23T19:31:58+5:302025-07-23T19:32:26+5:30
- तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करत होता. रात्री साडेअकराच्या सुमारास त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ केली.

तिच्या पोटावर ठोसा मारला;चारित्र्याच्या संशयावरून गभर्वती पत्नीला बेदम मारहाण
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना एरंडवणे भागात घडली. मारहाणीत पत्नीचा गर्भपात झाला असून, या प्रकरणी पती विरोधात अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रवी शाम वाघमारे (३५, रा. एरंडवणे) असे आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत त्याच्या पत्नीने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी याची पत्नी सात महिन्यांची गर्भवती आहे. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करत होता. रविवारी (दि.२०) रात्री साडेअकराच्या सुमारास त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ केली.
त्याने तिच्या पोटावर ठोसा मारला, तसेच तिचे केस धरून फरफटत नेले. रक्तस्त्राव सुरू झाल्याने पत्नीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाणीत गर्भपात झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघडकीस आले. पोलिस उपनिरीक्षक अनुसे या पुढील तपास करत आहेत.