Pune Crime : पुण्यात भरधाव गाड्यांचा वाद पोलिसांना धक्काबुक्की;पाच जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:36 IST2025-09-01T12:35:54+5:302025-09-01T12:36:57+5:30
आरोपीने स्कूटी व अन्य दुचाकी भरधाव चालवत असताना त्यांनी नंतर गाडी सूरज यांच्या गाडीसमोर उभी करून त्यांचा मार्ग आडवला.

Pune Crime : पुण्यात भरधाव गाड्यांचा वाद पोलिसांना धक्काबुक्की;पाच जणांवर गुन्हा दाखल
पुणे : भरधाव गाडी चालवल्यानंतर सुरू असलेला वाद मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस अंमलदारांनाच धक्काबुक्की करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर सुंदर नटकले (२६), राहुल संजय साळवे (२३), रोहित अशोक डोंगरे (२७, सर्व रा. भीमनगर, विश्रांतवाडी, पुणे), सिद्धी कांबळे (२४, रा. साप्रस आंबेडकर सोसायटी, येरवडा) आणि हर्षल भोसले (२५, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज बापूराव रणसिंग (३२, रा. घोरपडी बाजार) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
हा प्रकार ३० ऑगस्टला साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्कूटी व अन्य दुचाकी भरधाव चालवत असताना त्यांनी नंतर गाडी सूरज यांच्या गाडीसमोर उभी करून त्यांचा मार्ग आडवला. नंतर सूरज यांना हाताने मारहाण करून त्यांची चांदीची साखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी छेडछाडीची तक्रार दाखल करेन अशी दमदाटी आरोपींनी केली. नंतर शिवीगाळ करून आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी तेथून जाणाऱ्या अंमलदारांनी आरेापींना समजविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाच धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.