Pune Crime : पुण्यात बुधवार पेठेत पोलिसांची रात्री सर्च मोहीम; ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात

By किरण शिंदे | Updated: February 18, 2026 11:30 IST2026-02-18T11:30:16+5:302026-02-18T11:30:32+5:30

- पोलिसांनी सर्व महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्या नागरिकत्वाची पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Pune Crime Police conduct night search operation in Budhwar Peth, Pune; 11 Bangladeshi women detained | Pune Crime : पुण्यात बुधवार पेठेत पोलिसांची रात्री सर्च मोहीम; ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात

Pune Crime : पुण्यात बुधवार पेठेत पोलिसांची रात्री सर्च मोहीम; ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात

पुणे - पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी रात्री विशेष सर्च मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेदरम्यान ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. बुधवार पेठ परिसरात सुरू असलेल्या अवैध हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन सुरू केले होते. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

याप्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या महिला बांगलादेशी नागरिक असून त्या बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचेही प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

पोलिसांनी सर्व महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्या नागरिकत्वाची पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. संबंधित प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title : पुणे: बुधवार पेठ में पुलिस का छापा, 11 बांग्लादेशी महिलाएं हिरासत में

Web Summary : पुणे पुलिस ने बुधवार पेठ में छापा मारा, 11 बांग्लादेशी महिलाओं को वेश्यावृत्ति के संदेह में हिरासत में लिया। महिलाओं के पास उचित दस्तावेज नहीं थे। पुलिस उनकी नागरिकता का सत्यापन कर रही है और मामले की आगे जांच कर रही है।

Web Title : Pune: Police raid Budhwar Peth, 11 Bangladeshi women detained.

Web Summary : Pune police raided Budhwar Peth, detaining 11 Bangladeshi women suspected of prostitution. The women lacked proper documentation. Police are verifying their citizenship and conducting further investigation into the matter.