Video : चोरटे किया कारमधून आले सरपंचांची फॉर्च्युनर चोरली; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 13:26 IST2025-10-16T13:25:04+5:302025-10-16T13:26:07+5:30
- ही घटना यशराज टॉवर परिसरात, कोरेगाव भीमा–पुणे नगर रोडवर पहाटेच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे

Video : चोरटे किया कारमधून आले सरपंचांची फॉर्च्युनर चोरली; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
पुणे -पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा परिसरात आज पहाटेच वाहन चोरीची एक धक्कादायक घटना घडली आहे. गावातील सरपंच यांच्या आलिशान टोयोटा फॉर्च्युनर गाडीची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असून ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.
दरम्यान, ही घटना यशराज टॉवर परिसरात, कोरेगाव भीमा–पुणे नगर रोडवर पहाटेच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे. प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन ते तीन चोरटे एका किया कारमधून येताना आणि काही मिनिटांतच सरपंचांची फॉर्च्युनर घेऊन पसार होताना दिसत आहेत.
चोरट्यांनी आधी परिसराची रेकी केल्याचे संकेत फुटेजमधून मिळत असून, त्यांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केली असल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात आढळले आहे. घटनेनंतर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे कोरेगाव भीमा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.