Pune Crime:ओतूरमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू;अमृत लॉजमधील घटनेने खळबळ;पोलिसांचा तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 15:31 IST2026-05-16T15:30:33+5:302026-05-16T15:31:02+5:30

Pune Crime : मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणा

pune crime news suspicious death of woman in Otur; Incident at Amrit Lodge creates stir; Police investigation underway | Pune Crime:ओतूरमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू;अमृत लॉजमधील घटनेने खळबळ;पोलिसांचा तपास सुरू

Pune Crime:ओतूरमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू;अमृत लॉजमधील घटनेने खळबळ;पोलिसांचा तपास सुरू

ओतूर (पुणे जि.)  - पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे शनिवारी रात्री घडलेल्या एका संशयास्पद मृत्यूच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अवसरी (ता. जुन्नर) येथील स्नेहल अमूल शिंदे (वय ३०) या महिलेचा मृतदेह ओतूरमधील अमृत लॉजमध्ये आढळून आला.

अधिकच्या माहितीनुसार, वाघिरे महाविद्यालयासमोर असलेल्या अमृत लॉजमध्ये संबंधित महिला बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक पाहणीनंतर महिलेला तातडीने ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर ओतूर परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, मृत्यूमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा मृत्यू नैसर्गिक आहे की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस विविध अंगांनी करत आहेत. लॉजमधील नोंदी, सीसीटीव्ही फुटेज तसेच संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, अमृत लॉज हे शैक्षणिक परिसरालगत असल्याने स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही या ठिकाणाबाबत नाराजी व्यक्त केली होती. महाविद्यालयापासून अल्प अंतरावर असलेल्या अशा आस्थापनांवर प्रशासनाने अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे. 

Web Title : पुणे: ओतूर लॉज में महिला की संदिग्ध मौत, जांच शुरू

Web Summary : पुणे के ओतूर में अमृत लॉज में स्नेहल शिंदे नामक महिला मृत पाई गई। पुलिस संदिग्ध मौत की जांच कर रही है, सीसीटीवी फुटेज खंगाल रही है और लोगों से पूछताछ कर रही है। पोस्टमार्टम रिपोर्ट आने तक मौत का कारण स्पष्ट नहीं है। शैक्षणिक संस्थानों के पास लॉज होने पर चिंता जताई गई।

Web Title : Pune: Woman's Suspicious Death at Otur Lodge Sparks Investigation

Web Summary : A woman, Snehal Shinde, was found dead at Amrut Lodge in Otur, Junnar. Police are investigating the suspicious death, examining CCTV footage and questioning individuals. The cause of death is unclear pending autopsy results. Concerns raised about lodge's proximity to educational institutions.