शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
3
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
5
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
6
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
7
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
8
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
9
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
10
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
11
शिराळ्यात नाईक विरुद्ध नाईक चुलत भावांमध्ये लढत! केदार नलवडे रिंगणात; तिरंगी सामन्यात कोण मारणार बाजी ?
12
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
13
नुसती ढकलाढकली, मेट्रो जोडणीमुळे घाटकोपर स्टेशन ठरले गर्दीचे 'हॉटस्पॉट'!
14
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
15
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
16
कमाल! नोकरीसोबतच घरची जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
17
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
18
Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?
19
बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ; 'ही' आहेत प्रमुख ४ कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ड्राय डेच्या मध्यरात्री दारूविक्री;तक्रारदाराला शिवीगाळ; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 15:11 IST

ड्राय डे असूनही बॉलर पबमध्ये मध्यरात्री दारूविक्री सुरू असल्याची माहिती तक्रारदार सलमान खान यांनी नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर येरवडा पोलिसांची पथक घटनास्थळी दाखल

पुणे -  ड्राय डेच्या मध्यरात्री पबमध्ये दारूविक्री सुरू असल्याची तक्रार केल्यानंतर तक्रारदारालाच पबमध्ये उपस्थित व्यक्तीने पोलिसांच्या उपस्थितीत शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी बॉलर पबमध्ये उपस्थित व्यक्ती आर्यन नवले याच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ ऑगस्टच्या मध्यरात्री उघडकीस आली. सलमान खान यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

अधिकच्या माहितीनुसार, ड्राय डे असूनही बॉलर पबमध्ये मध्यरात्री दारूविक्री सुरू असल्याची माहिती तक्रारदार सलमान खान यांनी नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर येरवडा पोलिसांची पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस पाहणी करत असताना तक्रारदारालाही पबच्या आत जाऊ देण्याची विनंती करण्यात आली. मात्र, त्यावेळी पबमध्ये  उपस्थित आर्यन नवलेने तक्रारदाराला आत येण्यास मज्जाव केला, तसेच शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी दुहेरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्राय डेला दारूविक्री केल्याप्रकरणी बॉलर पबच्या मॅनेजरविरोधात स्वतंत्र गुन्हा पोलिसांनी तत्काळ नोंदवला होता. मात्र, त्याच वेळी घडलेल्या शिवीगाळ आणि धक्काबुक्कीच्या घटनेचा गुन्हा तत्काळ नोंदवण्यात आला नाही.

तक्रारदाराने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर हा गुन्हा नोंदवण्यात आला.  या घटनेबाबत विचारणा केली असता वरिष्ठ अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. म्हणजेच पोलिसांच्या उपस्थितीत घडलेला प्रकार असूनही त्वरित कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या येरवडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, ड्राय डेच्या रात्री घडलेल्या या वादग्रस्त घटनेमुळे पबच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी