चंदन नगर पोलीस ठाण्याच्या उद्घाटनानंतर दरोडा; सराफाकडून सोन्याचे दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 15:38 IST2025-08-08T15:38:28+5:302025-08-08T15:38:49+5:30
दुपारच्या सुमारास तिघे तरुण दुचाकीवरून आशापुरा ज्वेलर्स येथे आले. त्यांनी सराफा व्यावसायिकाला धमकावत जवळपास सोन्याचे दागिने चोरून नेले

चंदन नगर पोलीस ठाण्याच्या उद्घाटनानंतर दरोडा; सराफाकडून सोन्याचे दागिने लंपास
पुणे : नुकत्याच उद्घाटन झालेल्या चंदन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच गुरुवारी (८ ऑगस्ट) दुपारी धाडसी दरोड्याची घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आजच चंदन नगर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पार पडले असताना, काही वेळानंतरच आशापुरा ज्वेलर्स या सराफ दुकानावर तिघांनी दरोडा टाकून सोन्याचे दागिने लंपास केले.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास तिघे तरुण दुचाकीवरून आशापुरा ज्वेलर्स येथे आले. त्यांनी सराफा व्यावसायिकाला धमकावत जवळपास तीन ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर चंदन नगर पोलीस ठाण्यासह पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस तपासात दरोडेखोरांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.