शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पोर्शे अपघात प्रकरण : 'ते' दोन पोलिस अधिकारी बडतर्फ होणार ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 10:14 IST

अल्पवयीन कारचालकने वेगात कार चालवत दुचाकीला पाठीमागून धडक दिली होती.

किरण शिंदे

पुणे - पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण ज्याची संपूर्ण देशभरात चर्चा झाली. याच अपघात प्रकरणात दोषी आढळलेल्या पुणे पोलीस दलातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होते. आणि आता हे दोन पोलीस अधिकारी पोलीस सेवेतूनच बडतर्फ होण्याची शक्यता आहे. कारण या दोन अधिकाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी 'पोलीस महासंचालक' कार्यालयाकडे पाठविला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीच या संदर्भात माहिती दिली आहे.  पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे तसेच सहाय्यक निरीक्षक विश्वास तोडकरी अशी या दोन पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून येरवडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन गुन्हे निरीक्षक राहुल जगदाळे आणि रात्रपाळीवर कर्तव्यास असलेले सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना तेव्हा निलंबित करण्यात आले होते. त्यांची विभागीय चौकशी सुरू होती. विभागीय चौकशी पुर्ण झाल्यानंतर त्यात दोघे दोषी आढळले. त्यानूसार त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगचित्राचे होर्डिंग लावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, कल्याणीनगरमध्ये १९ मे २०२४ च्या मध्यरात्री पबमधून पार्टीकरून परत जात असताना अल्पवयीन कारचालकने वेगात कार चालवत दुचाकीला पाठीमागून धडक दिली होती. या अपघातात दुचाकी वरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर अपघातास कारणीभूत असलेल्या गर्भ श्रीमंताच्या मुलाला वाचवण्यासाठी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. राजकीय हस्तक्षेप आणि पैशाचा वापर करून  त्यातील आरोपीला वाचवण्यासाठी सर्वच यंत्रणा कशा कामाला लागल्या होत्या हे तेव्हा समोर आले होते. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे आई-वडिल, ससूनचे दोन डॉक्टर यांच्यासह दहा जणांना अटक केली. तेव्हापासून सर्वजन अद्यापही कारागृहात आहेत. त्यांना जामीन मिळू दिलेला नाही. दरम्यान, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPune Crimeपुणे क्राईम बातम्याPorscheपोर्शेPoliceपोलिस