पुणे : बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट (पारपत्र) मिळवल्या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी कुख्यात गुंड नीलेश बन्सीलाल घायवळ (वय ४९, रा. संत ज्ञानेश्वर काॅलनी, शास्त्रीनगर, कोथरूड) याच्यासह त्याला मदत करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. कोथरूड येथील गोळीबाराच्या घटनेनंतर घायवळ याच्यावर दाखल झालेला हा चौथा गुन्हा आहे.
याबाबत पोलिस उपनिरीक्षक माेहन जाधव यांनी फिर्याद दिली आहे. कोथरूड भागात किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबार झाला होता. या प्रकरणात निलेश घायवळ याच्यासह त्याच्या साथीदारांवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, निलेश घायवळ हा ९० दिवसांचा व्हिस काढून स्वित्झर्लंडला गेल्याचे समोर आले आहे. त्याने अहिल्यानगरमधून ‘तत्काळ’ पासपोर्ट मिळविला आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून केला जात आहे. घायवळ याला अटक करण्यासाठी पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीस बजावली आहे. ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव त्याने पासपोर्ट मिळवताना वापरले आहे. तपासासाठी पुणे पोलिसांचे पथक अहिल्यानगरला गेले, मात्र, घायळ याने पासपोर्ट मिळविण्यासाठी दिलेला पत्ता खोटा असल्याचे निष्पन्न झाले आले.
घायवळ याचे कोथरूडमधील शास्त्रीनगर भागात घर आहे. कोथरूड पोलिसांनी शनिवारी त्याच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेतली, त्यात पोलिसांना घरामध्ये दोन काडतुसे, चार पुंगळ्या मिळाल्या. पोलिसांनी या जप्त केल्या असून घायवळ याच्या घरातून धाराशिव, पुणे, मुळशी, जामखेड येथील जमिनीसंदर्भातील खरेदीखत, साठेखतासह अन्य कागदपत्रे, तसेच दहा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणी घायवळविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५१ चे कलम ५, ७, २५ (१), २७ (२) अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट कागदपत्रांद्वारे नीलेश घायवळने पासपोर्ट मिळविल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी घायवळ याच्यावर पासपोर्ट ॲक्ट, आधार कार्ड ॲक्ट, तसेच फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच घायवळ याला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या इतर दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. - संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ तीन
Web Summary : Notorious gangster Nilesh Ghaywal faces four cases, including one for obtaining a fake passport using forged documents. Police seized weapons, property documents, and gold from his residence. He's also booked under MCOCA after a shooting incident.
Web Summary : कुख्यात गुंडा नीलेश घायवळ पर फर्जी दस्तावेजों से पासपोर्ट बनवाने सहित चार मामले दर्ज हैं। पुलिस ने उसके घर से हथियार, संपत्ति के कागजात और सोना जब्त किया। गोलीबारी की घटना के बाद उस पर मकोका भी लगाया गया है।