Pune Porsche Case: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी मोठी कारवाई; दोन पोलीस अधिकारी सेवेतून बडतर्फ
By किरण शिंदे | Updated: December 10, 2025 15:25 IST2025-12-10T15:24:15+5:302025-12-10T15:25:23+5:30
या अपघातात एका भरधाव पोर्शे कारने दोन तरुणांना उडवत त्यांचा मृत्यू झाला होता. प्रकरणातील चौकशीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रारंभीची माहिती वेळेत न पोहोचल्याचे गंभीर निष्कर्ष समोर आले.

Pune Porsche Case: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी मोठी कारवाई; दोन पोलीस अधिकारी सेवेतून बडतर्फ
पुणे - कल्याणीनगर येथे १९ मे २०२४ रोजी झालेल्या भीषण पोर्शेअपघात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. येरवडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
या अपघातात एका भरधाव पोर्शे कारने दोन तरुणांना उडवत त्यांचा मृत्यू झाला होता. प्रकरणातील चौकशीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रारंभीची माहिती वेळेत न पोहोचल्याचे गंभीर निष्कर्ष समोर आले.
घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी म्हणून पोहचलेल्या दोन पोलिसांनी अपघाताची माहिती तात्काळ कंट्रोल रूमला न कळवल्याने ही माहिती रात्री ऑन ड्यूटी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली नव्हती, असा ठपका ठेवत ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलीस शिपाई अमित शिंदे आणि आनंदा भोसले या दोघांना पाच वर्षे पदाच्या मूळ वेतनावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कल्याणीनगर अपघातानंतर पोलिसांच्या निष्काळजीपणा विरोधात मोठी टीका झाली होती. त्यानंतर तपासात उघड झालेल्या त्रुटींवर आधारित ही मोठी शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून, पुढील चौकशीही सुरू आहे.