पीएफ, जीएसटीचे काम करून देण्याच्या बहाण्याने ९ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 20:00 IST2025-07-22T20:00:24+5:302025-07-22T20:00:51+5:30
ईएसआय व जीएसटीचे काम करून देण्याचे सांगून त्याच्या मावस भावाच्या फोन पेवर पैसे पाठवण्यास सांगून फिर्यादी चव्हाण यांची ९ लाख १९ हजार ३५९ रुपयाची फसवणूक केली.

पीएफ, जीएसटीचे काम करून देण्याच्या बहाण्याने ९ लाखांची फसवणूक
पुणे : पीएफ, ईएसआय व जीएसटीचे काम पूर्ण करून देण्याच्या बहाण्याने एकाने ९ लाख १९ हजार ३५९ रुपयाची फसवणूक केल्याची घटना हडपसर परिसरातील रामटेकडी येथे घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
संदीप भास्कर तांदळे (२५, रा. मगरीनबाई चाळ, रामटेकडी) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत वसंत किसन चव्हाण (७२, रामटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण हे पीएफ, ईएसआय व जीएसटीची कामे करतात. तांदळे याने चव्हाण यांचा विश्वास संपादन करून पीएफ, ईएसआय व जीएसटीचे काम करून देण्याचे सांगून त्याच्या मावस भावाच्या फोन पेवर पैसे पाठवण्यास सांगून फिर्यादी चव्हाण यांची ९ लाख १९ हजार ३५९ रुपयाची फसवणूक केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.