Pune Rape Case: शेतात कपडे सापडले, पोलिसांना संशय आला; मध्यरात्री चक्र फिरवली, स्वारगेट प्रकरणातील आरोपी कसा सापडला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 08:01 IST2025-02-28T08:00:19+5:302025-02-28T08:01:15+5:30

Dattatray Gade Arrested: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Pune Crime News Clothes found in the field, police became suspicious; They searched at midnight, how was the accused in the Swargate bus case found? | Pune Rape Case: शेतात कपडे सापडले, पोलिसांना संशय आला; मध्यरात्री चक्र फिरवली, स्वारगेट प्रकरणातील आरोपी कसा सापडला?

Pune Rape Case: शेतात कपडे सापडले, पोलिसांना संशय आला; मध्यरात्री चक्र फिरवली, स्वारगेट प्रकरणातील आरोपी कसा सापडला?

Dattatray Gade Arrested ( Marathi News ) : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा पोलिसांनी शोध सुरू केला होता, तो सापडत नव्हता. पोलिसांनी त्याला शोधून देणाऱ्यास १ लाखाचे बक्षिसही जाहीर केले होते. दरम्यान, आता त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याच्या शोधासाठी कालपासून पोलिसांनी त्याच्या गावात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. अखेर मध्यरात्री त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तो ऊसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना  मिळाली होती. पोलिसांनी शेतात त्याचे कपडे सापडले, यानंतर तो याच शिवारात असल्याचा पोलिसांना संशय आला.

बिबट्याचा वावर, सर्च ऑपरेशनवेळी जिवाची भीती आणि 'हाच तो दत्ता गाडे'...; स्वारगेटचा नराधम असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात

गुरुवारी पोलिसांनी दिवसभर आरोपी दत्तात्रय गाडे याचा युद्धपातळीवर शोध सुरू केला होता. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते. गावकऱ्यांनीही पोलिसांना मदत केली. दिवसभर शोधमोहिम करुन आरोपी पोलिसांना सापडला नव्हता. रात्र झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम बंद केली नाही, रात्रीही त्याला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शेतात त्याचे कपडे सापडल्यामुळे तो याच शिवारात असल्याचा पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांना आणखी शोध वाढवला. परिसरात ऊसाची शेती असल्यामुळे पोलिसांना आरोपीला शोधण्यास अडचणी यायला लागल्या. पोलिसांना आरोपीचे कपडे ज्या ठिकाणी सापडले त्याच ठिकाणी त्याचा शोध सुरू ठेवला. 
 
ओळखीच्या घरात पिण्याचे पाणी मागितले

तो दोन दिवसापासून याच शिवारात असल्याचा गावकऱ्यांना संशय आला होता. काही लोकांनी त्याला पाहिले होते. यामुळे पोलिसांना त्याच गावात आरोपी दत्तात्राय गाडे याचा शोध घेतला. दिवसभर शोधमोहिम सुरु ठेऊनही तो सापडला नाही, अखेर रात्री तो एका ओळखीच्या घरात पिण्याचे पाणी मागण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. यावेळी आरोपीने एक लिटर पाण्याची बाटली भरुन त्याने पुन्हा एकदा शेतात पळ काढला. पोलिसांनी त्या घराच्या आजूबाजूच्या शेतात त्याचा शोध घेतला, यानंतर पोलिसांना त्याचे कपडे सापडले. अखेर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला.     

Web Title: Pune Crime News Clothes found in the field, police became suspicious; They searched at midnight, how was the accused in the Swargate bus case found?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.