Pune Crime: लेकाला घेऊन जा, नाहीतर खाली फेकू...!आईला फोनवर धमकी; टेरेसवर नागेशवर सुरू होती निर्दयी मारहाण

By किरण शिंदे | Updated: March 15, 2026 17:41 IST2026-03-15T17:39:24+5:302026-03-15T17:41:46+5:30

काही वेळानंतर रात्री सुमारे 8 वाजता नागेशच्या मोबाईलवरूनच त्याच्या आईला फोन आला.

Pune Crime Mother threatened over phone; Nagesh was being brutally beaten on the terrace | Pune Crime: लेकाला घेऊन जा, नाहीतर खाली फेकू...!आईला फोनवर धमकी; टेरेसवर नागेशवर सुरू होती निर्दयी मारहाण

Pune Crime: लेकाला घेऊन जा, नाहीतर खाली फेकू...!आईला फोनवर धमकी; टेरेसवर नागेशवर सुरू होती निर्दयी मारहाण

पुणे - पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच कोथरूड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. केवळ एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या मैत्रीच्या रागातून 23 वर्षीय तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संताप आणि खळबळ निर्माण झाली आहे. मृत तरुणाचे नाव नागेश संजय जाधव (वय 23) असे असून तो शिवाजीनगर परिसरातील वडारवाडी येथे राहत होता. नागेश हा शिवाजीनगर भागात ऑफिस बॉय म्हणून काम करत होता आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात आईला मदत करत होता.  
 
याबाबत सामोरे आलेल्या माहितीनुसार, 14 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.15 वाजण्याच्या सुमारास नागेशला मोबाईलवर फोन आला. फोन आल्यानंतर तो घरातून मोटरसायकलवरून बाहेर पडला. काही वेळानंतर रात्री सुमारे 8 वाजता नागेशच्या मोबाईलवरूनच त्याच्या आईला फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने शिवीगाळ करत नागेशला कोथरूडमधील मेगासिटी परिसरात मारहाण केल्याचे सांगितले आणि 10 मिनिटांत येऊन तुमचा मुलगा घेऊन जा, नाहीतर खाली फेकून देऊ अशी धमकी दिली. यानंतर  नागेशची आई आणि काही नातेवाईक तातडीने कोथरूडमधील मेगासिटी परिसरात पोहोचले. तेव्हा परिसरात मोठी गर्दी जमली होती. नागेशला इमारतीच्या टेरेसवर मारहाण सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. नातेवाईक टेरेसवर पोहोचले असता नागेश गंभीर जखमी अवस्थेत खाली पडलेला होता. त्याचे कपडे फाटलेले होते आणि आजूबाजूला लाकडी दांडके पडलेले होते. काही महिला आणि पुरुष त्याला मारहाण करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  



या प्रकरणाबाबत पुणे पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
नातेवाईकांनी नागेशला तातडीने रिक्षातून गोखलेनगर येथील रत्ना हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला त्वरित ससून रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. ससून रुग्णालयात उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी नागेशला मृत घोषित केले.

Web Title : पुणे अपराध: नाबालिग लड़की से दोस्ती के कारण युवक की हत्या

Web Summary : पुणे में, एक नाबालिग के साथ दोस्ती के कारण 23 वर्षीय युवक की बेरहमी से हत्या कर दी गई। पीड़ित नागेश जाधव को छत पर पीटा गया। उसके परिवार को धमकी भरा फोन आया। पुलिस ने छह संदिग्धों को गिरफ्तार किया; जांच जारी है।

Web Title : Pune Crime: Youth killed for friendship with minor girl.

Web Summary : In Pune, a 23-year-old was brutally murdered over a friendship with a minor. The victim, Nagेश Jadhav, was beaten on a terrace. His family received a threatening call. Police have arrested six suspects; investigation ongoing.