Pune Crime : दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून आईकडून पोटच्या मुलाचा खून; मुलीवरही प्राणघातक हल्ला

By किरण शिंदे | Updated: January 27, 2026 17:08 IST2026-01-27T17:05:03+5:302026-01-27T17:08:06+5:30

पुणे - पुण्याजवळील वाघोली परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. दारुड्या पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळून ...

Pune Crime Mother kills her unborn child due to harassment from her drunkard husband; daughter also attacked | Pune Crime : दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून आईकडून पोटच्या मुलाचा खून; मुलीवरही प्राणघातक हल्ला

Pune Crime : दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून आईकडून पोटच्या मुलाचा खून; मुलीवरही प्राणघातक हल्ला

पुणे - पुण्याजवळील वाघोली परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. दारुड्या पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळून एका आईने आपल्या पोटच्या ११ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केला, तर १३ वर्षांच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला केला.  मात्र, प्रसंगावधान राखत जखमी अवस्थेत मुलीने घराबाहेर पळ काढल्याने तिचा जीव वाचला. या प्रकरणात सोनी संतोष जायभाय (वय अंदाजे 35) असे आरोपी महिलेचे नाव असून वाघोली पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

आज (मंगळावर) सकाळी वाघोलीतील बाईफ रोड परिसरात जायभाय कुटुंबीयांच्या घरात हा भयानक प्रकार घडला. घरात आई सोनी, मुलगा साईराज (वय ११) आणि मुलगी धनश्री (वय १३) हे तिघेच होते. सोनीने घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर तिने मुलगा साईराजला जवळ बोलावून काही कळण्याच्या आत त्याच्या गळ्यावर सुरीने वार केला. अतिरक्तस्त्राव झाल्याने साईराजचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर सोनीने मुलगी धनश्री हिच्यावरही चाकूने गळ्यावर वार केला. मात्र गंभीर जखमी अवस्थेतही धनश्रीने धाडस दाखवत घराबाहेर धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यातील धनश्रीला पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ घरात प्रवेश केला. नागरिकांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना साईराज रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आला, तर आरोपी सोनी जायभाय हिच्या हातांवर रक्त लागलेले होते. नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. जखमी धनश्रीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपी सोनी जायभाय हिने धक्कादायक कबुली दिली आहे. तिचा पती संतोष जायभाय हा रोज दारू पिऊन घरी यायचा, शिवीगाळ आणि मारहाण करायचा. या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तिने मुलांना संपवून स्वतःही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

जायभाय कुटुंबीय मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील रहिवाशी असून मागील काही महिन्यांपासून वाघोली परिसरात वास्तव्यास होते. संतोष जायभाय मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत होता, तर सोनी जायभाय खासगी कंपनीत काम करत होती. या प्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. 

Web Title : पुणे: शराबी पति से तंग आकर मां ने बेटे को मारा, बेटी पर हमला

Web Summary : पुणे के वाघोली में, एक माँ ने शराबी पति से लगातार उत्पीड़न के कारण अपने 11 वर्षीय बेटे की हत्या कर दी और अपनी 13 वर्षीय बेटी पर हमला कर दिया। बेटी भाग निकली और अस्पताल में है। घरेलू शोषण से प्रेरित होकर माँ को गिरफ्तार कर लिया गया है और उसने अपराध कबूल कर लिया है।

Web Title : Pune: Mother Murders Son, Attacks Daughter Due to Husband's Abuse

Web Summary : In Wagholi, Pune, a mother killed her 11-year-old son and attacked her 13-year-old daughter due to constant harassment from her alcoholic husband. The daughter escaped and is hospitalized. The mother has been arrested, confessing to the crime driven by domestic abuse.