Pune Crime: समलिंगी डेटिंग ॲपवरून ओळख, हुकअपच्या बहाण्याने कोंढव्यात बोलावून तरुणाची लूट

By किरण शिंदे | Updated: January 21, 2026 13:17 IST2026-01-21T13:17:37+5:302026-01-21T13:17:55+5:30

या घटनेत आरोपींनी तरुणाकडील ८० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून नेला आहे. 

Pune Crime Meet a young man through a gay dating app, call him to Kondhwa on the pretext of hookup, rob him | Pune Crime: समलिंगी डेटिंग ॲपवरून ओळख, हुकअपच्या बहाण्याने कोंढव्यात बोलावून तरुणाची लूट

Pune Crime: समलिंगी डेटिंग ॲपवरून ओळख, हुकअपच्या बहाण्याने कोंढव्यात बोलावून तरुणाची लूट

पुणेसमलिंगी डेटिंग ॲपवरून ओळख वाढवून हुकअपसाठी बोलावल्याचा बहाणा करत एका २७ वर्षीय तरुणाला  कोंढव्यात बोलावून मारहाण करत शस्त्राचा धाक दाखवून लूट केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत आरोपींनी तरुणाकडील ८० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून नेला आहे. 

वाघोली परिसरात राहणारा हा २७ वर्षीय तरुण मोबाईलवर समलिंगी डेटिंग ॲप पाहत असताना त्याच्या मोबाईलवर “Im Top” या आयडीवरून मेसेज आला. त्या मेसेजमध्ये एक मोबाईल नंबर देण्यात आला होता. उत्सुकतेपोटी तरुणाने त्या नंबरवर फोन केला. फोनवर दोघांमध्ये ओळख झाली. नाव, राहण्याचा पत्ता अशी प्राथमिक माहिती घेत आरोपीने स्वतःचे नाव राहील असल्याचे सांगितले.

त्यानंतर आरोपीने फिर्यादीला हुकअपसाठी कोंढव्यातील शितल पेट्रोल पंप परिसरात येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे फिर्यादी त्या ठिकाणी भेटीसाठी गेला. मात्र, तेथे गेल्यावर त्याला मोठा धक्का बसला. कारण समोर एकटा राहील नसून त्याच्यासोबत आणखी तिघेजण उपस्थित होते.

आरोपींनी फिर्यादीशी गोड बोलून त्याला पानसरे नगर आणि भारती वेदांत इंटरनॅशनल स्कूलसमोरील मैदानात घेऊन गेले. एकांत ठिकाणी पोहोचल्यानंतर राहील आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादीवर हल्ला चढवला. शस्त्राचा धाक दाखवत त्याच्याकडील मोबाईल फोन, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच एटीएममधून पैसे काढून जबरदस्तीने घेतले आणि तेथून पसार झाले.

या संपूर्ण प्रकारात आरोपींनी फिर्यादीकडील एकूण ८०,३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाणे येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, डेटिंग ॲपवरील आयडी, मोबाईल नंबर, सीसीटीव्ही फुटेज आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे तपास सुरू आहे.

Web Title : पुणे: समलैंगिक डेटिंग ऐप से लूट, मारपीट

Web Summary : पुणे के कोंढवा में एक 27 वर्षीय व्यक्ति को समलैंगिक डेटिंग ऐप के माध्यम से बुलाकर ₹80,300 लूटे गए और मारपीट की गई। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Pune: Gay Dating App Scam Leads to Robbery, Assault

Web Summary : A 27-year-old man was lured via a gay dating app to Kondhwa, Pune, assaulted, and robbed of ₹80,300. Police are investigating using app data and CCTV footage.