विवाह समारंभात पाटाखाली लिंबे सापडल्याने विवाहितेचा छळ;पती, सासूसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:20 IST2025-05-30T10:19:39+5:302025-05-30T10:20:36+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार तरुणीचे अंबरनाथ येथील तरुणाशी मे २०१९ मध्ये विवाह झाला होता. 

pune crime Married woman harassed after lemons were found under the bed during a wedding ceremony; case registered against four people including husband, mother-in-law | विवाह समारंभात पाटाखाली लिंबे सापडल्याने विवाहितेचा छळ;पती, सासूसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

विवाह समारंभात पाटाखाली लिंबे सापडल्याने विवाहितेचा छळ;पती, सासूसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : विवाह मंडपात पाटाखाली लिंबे सापडल्याने काळी जादू केल्याचा आरोप करून सासरकडील नातेवाइकांनी विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसंनी पती, सासूसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २५ वर्षीय तरुणीने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पती, सासू यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार तरुणीचे अंबरनाथ येथील तरुणाशी मे २०१९ मध्ये विवाह झाला होता. 

विवाहातील विधी करताना तरुणीच्या पाटाखाली दोन लिंबे सापडली. विवाह समारंभ पार पडल्यानंतर तरुणी सासरी आली. तेव्हा विवाहात पाटाखाली सापडलेली लिंबे, तसेच कौटुंबिक वादातून तरुणीला टोमणे मारण्यास सुरुवात करण्यात आली. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू करण्यात आला. तिला मारहाण करण्यात आली. जाचामुळे कंटाळून तरुणी माहेरी निघून आली. त्यानंतर तिने नुकतीच काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

विवाहितेचा छळप्रकरणी आणखी एक गुन्हा...

दरम्यान, विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी पती, सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २४ वर्षीय तरुणीने नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विवाहानंतर तरुणीचा छळ सुरू करण्यात आला. माहेरहून पैसे आणण्याची मागणी करण्यात आली. विवाहात दिलेले दागिने काढून घेतले. पैसे न दिल्यास घर सोडून जा, अशी धमकी पती, सासू, नणंदेने दिल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: pune crime Married woman harassed after lemons were found under the bed during a wedding ceremony; case registered against four people including husband, mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.