पोलीस असल्याचे भासवून करत होता वयोवृद्ध नागरिकांची फसवणूक; गुन्हे शाखेकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 16:07 IST2025-04-20T16:06:54+5:302025-04-20T16:07:13+5:30
आरोपीकडून एकूण ८ गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात आला असून ८ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

पोलीस असल्याचे भासवून करत होता वयोवृद्ध नागरिकांची फसवणूक; गुन्हे शाखेकडून अटक
लोणी काळभोर : पोलीस असल्याचे भासवून वयोवृद्ध नागरिकांची फसवणूक करणाऱ्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका सराईत आरोपीला शहर गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाने अटक केली आहे. शनिवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमी जवळ सापळा रचून हि कारवाई करण्यात आली आहे.हमीद अफसर खान (वय ३०, रा. पठारे वस्ती, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) यास मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडून एकूण ८ गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात आला असून ८ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे मधील पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लोणीकाळभोर येथील स्मशानभूमीजवळ सापळा आरोपीस मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले.दरम्यान, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारासह पुणे शहर व आजुबाजुच्या परिसरामध्ये हातचलाखीने फसवणुक करुन चोरी केल्याचे कबुल केले आहे. चौकशीतून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ तर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, एक मोटार सायकल जप्त करण्यात आली.
सदरची कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक, गुन्हे शाखा, प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सह पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे,नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती नरवडे यांनी केली आहे.