घायवळ टोळीचा गुंड सरोदेने अन्य साथीदारांसह गोळीबाराचा सराव केल्याचे तपासात निष्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:35 IST2025-12-16T17:34:53+5:302025-12-16T17:35:12+5:30
आरोपीची चौकशी करायची असल्याने विशेष सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे यांनी आरोपी सरोदेच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने आरोपीला १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

घायवळ टोळीचा गुंड सरोदेने अन्य साथीदारांसह गोळीबाराचा सराव केल्याचे तपासात निष्पन्न
पुणे : नीलेश घायवळचा अहिल्यानगरमधील सोनेगाव येथे बंगला असून, तेथे बैलपोळ्याच्या दिवशी घायवळ व टोळीचा गुंड अजय सरोदेने अन्य साथीदारांसह गोळीबाराचा सराव केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सरोदेचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. त्याच्याकडे सापडलेल्या पिस्तुल व काडतुसांच्या खरेदीसाठी त्याला कोणी आर्थिक मदत केली, याबाबत आरोपीची चौकशी करायची असल्याने विशेष सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे यांनी आरोपी सरोदेच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने आरोपीला १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
कोथरूड गोळीबार प्रकरणात परदेशात पळून गेलेल्या नीलेश घायवळसह एकूण सतरा आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी अजय महादेव सरोदे (वय ३२, रा. आझादनगर, कोथरूड) याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आरोपींनी संघटित गुन्हेगारी करून लाटलेल्या स्थावर व जंगम मालमत्ता यांसह भाजीविक्रेत्याला पिस्तूल-काडतुसांच्या खरेदीसाठी आर्थिक मदतीचा तपास तपास करायचा आहे, असे हिरे यांनी न्यायालयात सांगितले.