शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दहा कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; बँकॉक येथून आलेले दोघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 10:19 IST

‘डीआरआय’च्या पथकाने मुंबईतून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडूनदेखील गांजा जप्त करण्यात आला.

पुणे : महसूल गुप्तचर विभागाकडून (रेव्हेन्यू इंटेलिजन्स डिपार्टमेंट) पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दहा कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी बँकॉक येथून आलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार ‘डीआरआय’च्या पथकाकडून मुंबईतून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

बँकाॅकहून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी (दि.१२) दोनजण उतरले. त्यांच्याकडे हायड्रोपोनिक गांजा असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या मुंबई पथकाला मिळाली. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी विमानतळावर दोघांची चौकशी केली. त्यांच्याकडे असलेल्या सामानाची तपासणी करण्यात आली. तेव्हा प्लास्टिकच्या पिशवीत हायड्रोपोनिक गांजा सापडला. चौकशीत मुंबईतील एकाकडे हायड्रोपोनिक गांजा विक्रीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती दोघांनी दिली. ‘डीआरआय’च्या पथकाने मुंबईतून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडूनदेखील गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत दहा किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत दहा कोटी रुपये असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यात येत असून, यापूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केंद्रीय सीमा शुल्क (कस्टम), तसेच डीआरआयच्या पथकाने तस्करी करुन आणलेले अमली पदार्थ, तसेच सोने जप्त केले आहे. हायड्रोपोनिक गांजा रासायनिक प्रक्रिया करून तयार केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत जास्त आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याAirportविमानतळ