पुण्यातील नऱ्हेगाव परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली. हा तरुण मूळचा नांदेड जिल्ह्यातील भोकरचा असून, प्रेमप्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन तरुणांना नांदेड जिल्ह्यातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक तरुणीचा भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संदीप रंगराव भुरके (वय २८, रा. भोकर, जि. नांदेड) आणि ओमकार गणेशराव किरकन (वय २४, रा. भोकर, जि. नांदेड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जावेद ख्वाजामियां पठाण (वय ३४, सध्या रा. नऱ्हेगाव, मूळचा रा. मुदखेड रोड, ख्वाजानगर, शनी मंदिराजवळ, भोकर, जि. नांदेड) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
हत्या करण्यापूर्वी काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप भुरके याची बहीण आणि मयत जावेद यांचे प्रेमसंबंध होते. दोघेही नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्येच राहत होते. दोघांची घरे एकमेकांच्या शेजारी असल्याने अनेक वर्षाची ओळख होती आणि त्यातूनच संदीपची बहीण आणि जावेद यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
जावेदचे हे प्रेमसंबंध तरुणीचा भाऊ संदीप भुरके याला मान्य नव्हते. तरुणीच्या कुटुंबीयांकडून होत असलेल्या विरोधामुळे जावेद प्रेयसीसह भोकरमधून पळाला. ते दोघे पुण्यात आले आणि नऱ्हे परिसरात एकत्र राहत होते.
संदीपने जावेदला शोधले अन्...
जावेद बहिणीला पळवून घेऊन गेल्याची गोष्ट संदीप भुरके याच्या जिव्हारी लागली. याचा राग त्याच्या मनात खदखदत होता. दरम्यान, बहीण पुण्यात असल्याची माहिती संदीप भुरके याला मिळाली.
संदीप त्याच्या एका मित्रासह पुण्यात आला. जावेद ज्या ठिकाणी राहत होता, त्या ठिकाणी जाऊन त्याने जावेदशी वाद घातला. दोघांमधील शाब्दिक वाढत गेला. त्यांच्यामध्ये हाणामारी सुरू झाली.
त्यातच संतापलेल्या संदीपने धारदार शस्त्राने जावेदवर सपासप वार केले. जावेदच्या डोक्यात आणि शरीरावर इतर ठिकाणी गंभीर घाव झाल्याने जावेद जागीच कोसळला.
जावेद खाली पडल्यानंतर आरोपी पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेत जावेदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ससून रुग्णालय येथील डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले.
पोलिसांनी भोकरमध्ये जाऊन ठोकल्या बेड्या
हत्येची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी एक पथक स्थापन केले. परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास करत पोलिसांनी आरोपीचा माग काढला.
दोन्ही आरोपी नांदेड जिल्ह्यातील मूळ गावी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आंबेगाव पोलिसांच्या तपास पथकाने दोघांनीही शिताफीने ताब्यात घेतले.
Web Summary : A young man was murdered in Pune due to a love affair. The victim eloped with a girl from Nanded, angering her brother, who then killed him. Police arrested two suspects from Nanded.
Web Summary : पुणे में प्रेम संबंध के चलते एक युवक की हत्या कर दी गई। पीड़िता नांदेड से एक लड़की के साथ भाग गया था, जिससे उसके भाई को गुस्सा आ गया, जिसने बाद में उसकी हत्या कर दी। पुलिस ने नांदेड से दो संदिग्धों को गिरफ्तार किया।