शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

१०४ कामगारांच्या नावे बनावट पीएफ खाती उघडून फसवणूक

By नितीश गोवंडे | Updated: April 2, 2025 18:54 IST

- कंपनीच अस्तित्वात नसल्याचा भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला पत्ताच नाही

पुणे : कंपनीच अस्तित्वात नसताना १०४ कामगारांच्या नावे बनावट भविष्य निर्वाह खाते (पीएफ) उघडून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. बनावट खाते उघडल्याचा प्रकार भविष्य निर्वाह निधी कार्यालयालाच माहिती नव्हता. काही कामगारांना खाते बंद करुन पैसे काढण्यासाठी धमकावण्याचा मेसेज सोशल मीडियाद्वारे पाठवण्यात आला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी श्री गणेश एंटरप्राइजेसचा मालक सीताराम ठकाणसिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकारी जयकिसन मोहनदास मनवानी (वय ४९, रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम ठकाणसिंग (रा. साठे वस्ती, सणसवाडी) याने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या संकेतस्थळावर श्री गणेश एंटरप्राइजेस या फर्मची नोंदणी केली होती. २३ डिसेंबर २०२० रोजी त्याने याबाबत अर्ज केला होता. त्यानंतर त्याला कार्यालयाकडून सांकेतिक क्रमांक देण्यात आला. या कंपनीत १०४ कामगारांच्या नावे ऑनलाइन पद्धतीने ‘पीएफ’ खाते उघडण्यात आले.त्यानंतर श्री गणेश एंटरप्राइजेस नाव असलेल्या वेगवेगळ्या कंपनीतील ११ कर्मचाऱ्यांनी ई-मेलद्वारे जून २०२४ मध्ये भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे तक्रार दिली. संबंधित कंपनीत काम केले नसल्याचे त्यांनी कळवले होते. त्यांच्या संमतीशिवाय बनावट ‘पीएफ’ खाते उघडण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. संबंधित खाते रद्द करण्यासाठी अज्ञाताने सोशल मीडियाद्वारे मेसेज पाठवला असून, तो पैसे मागत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. याबाबत चार कर्मचाऱ्यांनी ते वास्तव्यास असलेल्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या. त्यानंतर भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील क्षेत्रीय आयुक्त यांनी श्री गणेश एंटरप्राइजेस या फर्मच्या मालकांची पडताळणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार फिर्यादी मनवानी, त्यांचे सहकारी डी. एस. तिलवणकर, अधिकारी अमोद देशपांडे हे ३१ जुलै २०२४ रोजी नगर रस्त्यावरील सणसवाडीत असलेल्या साठे वस्तीतील श्री गणेश एंटरप्राइजेस या कंपनीच्या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी गेले. तेव्हा या भागात अशा प्रकारची कंपनीच अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. कंपनीचे मालक सीताराम ठकाणसिंग याचा ठावठिकाणा लागला नाही. बनावट कंपनीच्या नावे ठकाणसिंग याने कामगारांच्या नावे बनावट ‘पीएफ’ खाते उघडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर १ ऑगस्ट २०२४ राेजी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील आयुक्तांना अहवाल सादर करण्यात आला. आठ महिन्यांनी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. या प्रकरणी श्री गणेश एंटरप्राइजेसचा मालक सीताराम ठकाणसिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक धीरज कांबळे पुढील तपास करत आहेत. बनावट ‘पीएफ’ खात्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित?ठकाणसिंग याने बनावट ‘पीएफ’ खाते उघडले तसेच बनावट दुकान परवाना काढल्याचे उघडकीस आले आहे. १०४ कामगारांच्या नावाने बनावट ‘पीएफ’ खाते काढण्यात आले. या खात्यात कंपनी मालक दरमहा भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरत नव्हता, ही बाब भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकाऱ्यांना लक्षात कशी आली नाही, कंपनी अस्तिवात नसताना दुकान परवाना कसा मिळवला तसेच बनावट खाते काढण्याचा नेमका उद्देश काय होता, यादृष्टीने पोलिसांना तपास करावा लागणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या