शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : गांजा विक्री प्रकरणात करमाळ्यातील चौघे गजाआड; ७२ किलो गांजासह कार जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 09:50 IST

गुन्हे शाखेच्या युनिट सातचे सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे आणि पथक हे पुणे-अहिल्यानगर रस्ता परिसरात गस्त घालत होते

पुणे : करमाळा, जि. सोलापूर परिसरातून पुणे शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या चौघांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून ७२ किलो गांजा आणि कार असा १९ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. केसनंद-वाडेबोल्हाई रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. भिवा कालिदास वाघमोडे (वय ३६), विष्णू भागवत वाघमोडे (वय २८), हरी श्रीपती ढवळे (वय ३२) आणि मनोज अनिल सुरवसे (वय २९, चौघे मूळ रा. करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट सातचे सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे आणि पथक हे पुणे-अहिल्यानगर रस्ता परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी कारने चार जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी ऋषीकेश ताकवणे यांना मिळाली. केसनंद-वाडेबोल्हाई रस्ता परिसरात पोलिसांनी सापळा लावला. पोलिसांनी कार अडवत, चौघांची चौकशी सुरू केली. कारच्या डिक्कीत एका पोत्यात ५८ किलो गांजा असल्याची माहिती चौकशीत पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गांजा ठेवलेले पोते जप्त केले. आरोपींनी पुणे शहरात गांजा विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना दिली.

आरोपींनी करमाळ्यातील घरात गांजा लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांचे पथक करमाळ्याला रवाना झाले. करमाळ्यातील धायखिंडी परिसरातील आरोपींच्या घरातून १४ किलो गांजा जप्त केला. पोलिसांनी या कारवाईत एकूण मिळून ७२ किलो गांजा आणि कार असा मुद्देमाल जप्त केला. आरोपी गांजा कोणाला विक्री करणार होते, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सातच्या पोलिस पथकाने ही कारवाई केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Four Arrested in Ganja Sale Case; 72 kg Seized

Web Summary : Pune police arrested four individuals from Karmala for selling ganja, seizing 72 kg of the drug and a car worth ₹19.93 lakhs. The arrests occurred near Kesnand-Wadebolhai road. Further investigation is underway to determine the intended recipients of the ganja.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या