शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
2
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
3
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
4
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
5
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
6
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
7
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
8
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी
9
"म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे...", आताच्या मालिकांवर रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
10
"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान    
11
Rahu Mangal Transit 2025: राहू-मंगळ षडाष्टक;'या' पाच राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी!
12
अभिमानास्पद! भगवद्गीता, नाट्यशास्त्राला UNESCO ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये मिळालं स्थान
13
Video: Mumbai Indians च्या विजयानंतर नीता अंबानी ड्रेसिंग रूममध्ये! 1,2,3 म्हणताच सगळे ओरडले...
14
Video - प्रसिद्धीसाठी काहीही! धावत्या मेट्रोत तरुणीने वेधलं लक्ष; हँडलला लटकून केली स्टंटबाजी
15
भीषण! बुलढाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
16
जगभर : रेल्वेच्या खिडकीतून बेल्जियमच्या लुना बटियन्सने पाहिली अमेरिका!
17
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
18
ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? दिग्पाल लांजेकरांचं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले- "प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला..."
19
तुमचेही पैसे ब्लूस्मार्ट वॉलेटमध्ये अडकलेत? रिफंडसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस फॉलो करा
20
"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव

प्लॉट धारकांचा रस्ता अडवून खेडच्या माजी उपसभापतीने केली खंडणीची मागणी; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 10:09 IST

जे प्लॉट धारक बांधकाम करत आहेत, ती बांधकामे आम्हांलाच द्यायची, इतर कुणाला द्यायची नाही.

चाकण : प्लॉट घेतलेल्या नागरिकांचा रस्ता अडवून तो पुन्हा मोकळा करून देण्यासाठी आर्थिक रकमेची मागणी केल्याची घटनासमोर आली आहे.महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी खेड पंचायत समितीचा माजी उपसभापती अमर एकनाथ कांबळे व त्याचा भाऊ अनिल एकनाथ कांबळे यांच्यावर गुरुवारी ( दि.१३ ) खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. धर्मसिंग मुक्त्यारसिंग पाटील ( वय.३९ वर्षे, रा. कुरुळी,ता.खेड ) यांनी याप्रकरणी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कुरुळी (ता.खेड ) गावातील इंद्रायणी पार्क येथे फिर्यादी पाटील यांनी स्वमालकीचा सन २०२३ साली दोन गुंठे प्लॉट घेतला.फिर्यादी पाटीलयांच्याबरोबर एकूण ३४० नागरिकांनी इंद्रायणी पार्क येथे प्लॉट खरेदी केला आहे.काही प्लॉट धारकांनी त्याठिकाणी आपल्या घराचे बांधकामही सुरु केले आहे.याच प्लॉटला पुणे - नाशिक महामार्गापासून प्रवेश करण्यासाठी जो रस्ता आहे, त्याचा वहिवाटी करारनामा दुय्यम निबंधक यांच्याकडून रीतसर करून घेण्यात आला आहे. प्रथम करारनामा इंद्रायणी पार्क विकासक यांचा आणि अमर कांबळे व त्याचा भाऊ अनिल कांबळे यांच्या सहमतीने देण्यात आला होता.त्यानंतर तसाच करारनामा विकासक आणि प्लॉट धारक यांच्यात झाला आणि प्लॉटींगसाठी रस्ता देण्यात आला आहे. रस्ता सुरळीत सुरु असताना खेड पंचायत समितीचा माजी उपसभापती अमर कांबळे आणि त्याचा भाऊ अनिल कांबळे यांनी जे प्लॉट धारक बांधकाम करत आहेत, ती बांधकामे आम्हांलाच द्यायची, इतर कुणाला द्यायची नाही.

त्यामुळे ब-याच प्लॉट धारकांनी अजूनही बांधकामे सुरु केली नाहीत. परंतु याच प्लॉटमधील तब्बसुंम बी शेख साजिद पिंजारी ( रा.पिंपळे गुरव ), राजेश बंकटराव जाधव (रा.मोशी), दिनेश रमेश काकुलते व प्रशांत काळडोके यांनी बांधकाम सुरु केले असून, त्यांनी हे बांधकाम अमर कांबळे यांना न देता प्लॉटधारकांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे दुसऱ्यांना दिले आहे.याच गोष्टीचा राग धरून अमर कांबळे व अनिल कांबळे यांनी दि.३१ डिसेंबर २०२४ रोजी एक मोठी कंटेनरची केबिन  येणाऱ्या जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या गेटवर ठेवली आहे. सदर रस्ता वहिवाटी करता पूर्णतः बंद केला आहे.तसेच अमर कांबळे व त्याचा भाऊ अनिल कांबळे यांनी तुम्ही बांधकाम कसे करता व प्लॉटवर कसे येता जाता आम्ही बघतोच अशी धमकी दिली. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड